मक़सूद अली
यवतमाळ: महिला दिवसच्या निमित्ताने महिलांच्या सशक्तीकरण सारख्या मुद्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे उद्देशाने मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेलफेअर जिल्हा यवतमाळ च्या वतीने अंतरराष्ट्रीय महिला दिवस चे निमित्ताने महिला सशक्तीकरण सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येथील भोसा रोड स्थित अंबर लॉन मध्ये रविवार 18 मार्च ला दुपारी 2.30 ते 5.30 वाजता होईल. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून माजी जि.प. सदस्य अॅड सिमा तेलंगे लोखंडे महिलांची आर्थिक स्थिती व संवैधानिक अधिकार या विषयावर, जेष्ठ कवी तथा साहित्यीक विद्या खडसे महिलांची सामाजिक स्थिती या विषयावर तर माणकापर ची सरपंच प्रा.वर्षा निमक या महिलांचे शैक्षणिक स्थिती वर विचार व्यक्त करतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष एमपीजे महिला विंग च्या सेक्रेटरी डॉ.तसनीम बानो नागपूर राहतील, प्रमुख अतिथी म्हणून मुहम्मद अलताफ हुसैन नांदेड, महाराष्ट्र सेक्रेटरी हुसैन खान उपस्थित राहतील. कार्यक्रमास नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
