मक़सूद अली
उमरखेड : - मुव्हमेन्ट फॉर पीस अॅन्ड जस्टीस फॉर वेलफेअर ( एमपीजे ) या सामाजीक संघटने च्या वतीने पालीका मुख्याधिकारी यांना शहरातील वाढते अवैध गतीरोधक त्वरित काढण्यासाठी निवेदन देण्यात आले .या निवेदनात नगर परिषदे तर्फे शहरात ठिक-ठिकाणी बेकायदेशीर व अवैध गतीरोधक टाकण्यात आल्याचे सांगून या वाढत्या गतीरोधका मुळे दुचाकीस्वारांना कमरेच्या हाडांचा त्रास होत असल्याचे नमुद करण्यात आले आहे . तसेच हातगाडी व लोडगाडी वाल्यांना याचा भरपुर त्रास होत असल्याचे सांगत अॅटोमध्ये प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना याचा त्रास होतोच होतो पण रूग्णांचे या गतीरोधकामुळे बेहाल होत असल्याचे सांगण्यात आले आहे .लहान दुचाकी वाहने व अॅटो ज्यांचे इंजिन खाली असतात व त्यात रोड व वाहन यात फारच कमी अंतर असते त्यांचे इंजिन चे पण नुकसान होत आहे .नांदेड रोड ते ताजपुरा वार्ड कडे जाणाऱ्या रस्त्यावर दहा ते बारा गतीरोधक आहेत , आंबेडकर वार्ड ते तातारशहा वार्ड रसत्यावर असंख्य गतीरोधक आहेत तसेच शहरात सिमेंट रोडचे स्वर्णपथाचे काम सुरू असुन या रस्त्यावर सर्व प्रकारच्या मिरवणुका जातात तेथे पण बाजार लाईनमध्ये पण अनेक गतीरोधक टाकण्यात आले आहे . असे गतीरोधक टाकणे बेकायदेशीर असून अशा प्रकारचे गतीरोधक टाकण्यावर मा . उच्च न्यायालयाने प्रतिबंध केले असल्याचे पण निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे .या व्यक्तिरिक्त संपूर्ण शहराची पाहणी करून अनावश्यक व बेकायदेशीर गतीरोधक त्वरित काढण्याची मागणी एमपीजेच्या निवेदनात करण्यात आली आहे .बेकायदेशीर गतीरोधकामुळे जनतेच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही . म्हणून हे गतीरोधक काढणे लोकांच्या हिता आहे .
गतीरोधक त्वरित न काढल्यास नाईलाजास्तव मा . उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही एमपीजेचे शहराध्यक्ष शेख मोहसीन शे .करीम यांनी या निवेदना व्दारे मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे .