गानचक्षू कोल्हाळे गुरुजींना 'भजनांजली'ने श्रद्धांजली



मूर्तिजापूर,ता.१५ : आयुष्यभर संगीतसाधना करणारे ज्ञानचक्षू रामकृष्ण कोल्हाळे गुरुजी यांना महाराष्ट्र संगीत विद्यालय व गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने विद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी 'भजनांजली'च्या रुपात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  श्री गुरुदेव सेवा समितीच्या सामुदायिक प्रार्थनेने सुरु झालेल्या या कार्यक्रमात ध्यानसाधनेनंतर गुरुजींना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसमवेत प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या गुरुजींच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच संघर्षमय जिवनपट यावेळी श्री. सूर्यवंशी यांनी उलगडला.  त्यानंतर पंडीत रघुनाथ कर्डीकर यांनी तुकडोजी महाराजांच्या १६ भजनांचा समावेश असणाऱ्या 'भजनांजली' च्या भावपूर्ण सादरीकरणातून गुरुजींना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांना तबल्यावर प्रशांत दुधे संवादिनीवर प्रा. सुनील इंगोले तसेच सौरभ ठमके, चेतन आमटे, अक्षय जाधव, जगदीश पंत मेटकर यांनी साथ दिली.
त्यानंतर शिष्य वर्गाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्याम कोल्हाळे, निलेश मेहरे, निलेश ढाकरे, राम आत्राम, गजानन इंगळे, विष्णू लोडम, अतुल बोंडे, श्री. देशमुख, माधवराव काळे, अक्षय बुराणे, मयुरेश कुळकर्णि, आशुतोष मेहरे, प्रवीण पांडे तसेच गुरूजींचा शिष्यवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post