शासकीय रुग्णालयात एक्सप्रेस फिडर निर्मिती कामाचे भूमिपूजन




  • रूग्णांना मिळणार मोठा दिलासा

मुर्तिजापूर:(प्रतिनिधी): येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेता
आमदार हरिष मारोतीआप्पा पिंपळे यांच्या अथक प्रयत्नातून  एक्सप्रेस फिडर अखंडीत विद्यृत पुरवठा निर्मितीची व्यवस्था करण्यात आली,वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत,तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना देखील विना लाईट व पंखाचे बाहेर झोपावे लागत असे,यावर लक्ष केंद्रित करून आ.हरिष पिंपळे यांनी एक्सप्रेस फिडर मंजूर करून घेतले,त्याकरिता अंदाजे ४७ लक्ष रुपये मंजुरात करून घेत आज दिनांक १८ मार्च २०१८ ला  भूमिपूजन आ. हरिष पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळीभाजपा शहर अध्यक्ष  भारत भगत,उपाध्यक्ष कमलाकर गावंडे,तालुका अध्यक्ष नारायणराव भटकर,नगरसेवक सचिन देशमुख,सुनील पवार,प्रशांत डाबेराव,रावसाहेब कांबे,चंद्रकांत तिवारी,,गजानन नाकट,राजू सदार,प्रशांत हजारी,अविन अग्रवाल,राजकुमार नाचणे,संदीप जळमकर,राहुल पाटील,राहुल गुल्हाणे,बबलू भेलोंडे,राजू हांडे,पंत सर,नामदेव चव्हाण,कृष्णराव गावंडे,,शालिनीताई हजारे,राधताई तिवारी,सुनील लशुवाणी,हर्षल साबळे,अमोल पिंपळे,जगदीश कडू,सुभाष गोसावी,डॉ.रश्मी जवजाळ,रितेश सबाजकर,अविनाश यावले,छत्रपती साबळे,निलेश वानखडे,योगेश फुरसुले,यादी जण व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते,  सह रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post