शासकीय तंत्रनिकेतनाच्या हेंडज,(मुर्तिजापुर) मनमानी करभारा



  • विरुद्ध आक्रमक झाली युवासेना विद्यार्थी पिताहेत कपडे धुण्याचे पाणी तर प्रध्यापक पित आहे
  • थंड RO चे पाणी युवासेने तर्फे शिक्षनमंत्री विनोद तावडे यांना निवेदन काॅलेज प्रशासनला दिल ४ दिवसाचे अल्टिमेटम अन्यथा उभारणार आंदोलन.
  • युवासेना जिल्हासचिव अभिजीत मुळे पाटील  यांनी घेतला पुढाकार
मुर्तिजापूर : शासकीय तंत्रनिकेतन हेंडज येथे विद्यार्थीना पाण्याच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी कपडे धुण्याचे पाणी पित आहे. मात्र प्रध्यापक वर्ग मागवत आहे स्वता:साठी थंड RO चे पाणि, या समस्येकडे
काॅलेज प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून युवासेना
याविरुद्ध आंदोलन उभारणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन हेंडज येथे शासकीय वस्तिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीना पाण्यच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वस्तिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्क कपडे धुण्याचे पाणी पिण्ययासाठी वापरावे लागत आहे. त्यामुळे विध्यार्थीच्य आरोग्य सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी युवासेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील व जिल्हासमन्वयक निखीलसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनात
जिल्हा सचिव अभिजीत_मुळे_पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्राचार्याना निवेदनसुद्धा देण्यात आले आहे.
तंत्रनिकेतनमध्ये पाण्याची उपलब्धता आहे मात्र प्रशासनाकडुन मोटार पंप जाणीवपूर्वक बिघाड करून ठेवले आहे. याकरिता विद्यार्थीनी वेळोवेळी प्राचार्यानाही सांगितले आहे मात्र याकडे त्यांना लक्ष देण्यास वेळ नसल्याचे दिसून येत आहे. एन परिक्षेच्या काळात विध्यार्थीना होणाऱ्या या त्रासामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक व आरोग्यविषयक नुकसान होत आहे. तसेच दूषित पाण्यामुळे विद्यार्थीची जीवितहानीही होवू शकते याकडे लक्ष देण्याची गरज आहे. याकरिता जिल्हाधिकारी यांच्यामार्फत
शिक्षणमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. ४ दिवसाच्या आत काॅलेज प्रशासनाने समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्याची पूर्तता न झाल्यास युवासेना मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारणार आहे. निवेदन देते वेळी मुर्तिजापुर ता.प्रमुख शेखर मोरे,बार्शिटाकळी ता.प्रमुख सागर चव्हाण शिवसेना ता.सचिव शिवा गव्हाने युवासेना काॅलेज प्रमुख सागर इंगळे पाटील
प्रतिक देशमुख,आदित्य भांडे पाटील प्रथमेश काळे,सैरभ इगळे,अक्षय ढोरे,अक्षय लकडे,तेजस सावळे,शुभम राजपुत,वैभव वानखडे,
यांची प्रामुख्याने उपस्थित होती.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post