प्रकाश श्रीनिवास
मूर्तिजापुर :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्सव दि.४ फेब्रुवारी रोजी शिवाजी चौक येथे शिवसेना शहराचे वतीने शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दत्तात्रय आव्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली. मूर्तीजापुर शहर शिवसेनेच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती शिवाजी चौक येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना श हर प्रमुख तथा नगरसेवक विनायक गूल्हाने, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक दारकाप्रसाद दुबे,ज्ञानेश्वर गडवाले, नगरसेवक सचिन देशमुख, बंडु पाटील, संगीत कांबे, माजी शिवसेना तालूका प्रमुख गजानन चौधरी, जगदेव छबीले,नगरसेवक कैलास महाजन,संदीप जळमकर,मोहन वसुकार,समाजसेवक कमलाकर गावंडे, राहुल पाटील, नासीरभाई,लाला डाबेराव,भारत जेठवाणी,गजानन नाकट,सुनील पवार,वैभव यादव, आशीषबरे,संजय गुप्ता, आदीचीप्रमुख उपस्थितीती होती. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे हस्ते शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक दत्तात्रय आव्हाडे यांनी कार्यक्रमात शिवचरीत्रावर आधारित पुस्तकाचे वितरण मान्यवरांना केले. त्यानंतर रितसर कार्यक्रमाला सूरूवात झाली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यरांनी शिवचरीत्रावर आपले मनोगत व्यक्त केले. संचालन व आभार किशोर श्रीराव यांनी केले. कार्यक्रमाला शिवसेना शहराचे दुर्गा अंभोरे, मुन्ना नाईकनवरे, वासुदेव तांबडे, गोपाळराव गूल्हाने, बालु टांक, महेंद्र नवघरे, देवीदास गोळे माजी नगरसेवक, विनोद सदाफळे, अँड.यदवर,सचिन गूल्हाने, मंगेश गूल्हाने, शेख ईमरान,अमोल शिंदे, राजु कपीले,कुषणा गाडेकर,डिगांबर गूल्हाने, दिलिप कुरवाडे,गजानन गूल्हाने, प्रा.प्रमोद ठाकरे, अभीनव गूल्हाने, सविनय गूल्हाने, संजय गूल्हाने यांचेसह बहुसंखेने शिवसेना शहराचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
