यवतमाळ(प्रतिनिधि मक़सूद अली)
राज्यातील धरणे व जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ व्हावी म्हणून धरणांतील गाळ काढून तो शेतात वापरण्यासाठी राज्य सरकारने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत इंद्रठाणा , मुकंदीपूर व फत्तेपूर या गावांमध्ये करण्यात आली आहे. या दोन्ही गावात असलेल्या पाझर तलावातील गाळ उपसण्याच काम सुरु करण्यात आली आहे. सुरवात मुकंदीपूर गावातील तलावा पासून करण्यात आली आहे.
या पाझर तलावामुळे गावातील १०० पेक्षा जास्त शेतकरी बांधवाना त्याचा जास्त प्रमाणात फायदा होणार आहे.तलावातील गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या मशीनची व्यवस्था दिलासा संस्थेतर्फे करण्यात आली असून गायत्री महिला बहूउद्देशीय संस्थेने सहकार्य केले. या वेळी जिल्हा परिषदचे सदस्य निखिल जैत, भारत मेश्राम, दिलासा संस्थेचे अमोल साखरकर , पंचायत समितीचे उपसभापती समीर माहुरे पाटील, उमेश गोळे , मनोज नाले , नायब तहसीलदार चितकुंटलवार , व इंद्रठाणा ग्रामपंचायत सरपंच माया शेषराव तायडे उपस्तिथ होते.
गावातील तलावांमध्ये अधिक प्रमाणात गाळ साठत असून त्यातील पाणी साठवण्याची क्षमता कमी होत असल्याने गावकरी अनेक दिवसांपासून गाळ उपसण्याची मागणी करत होते व लागेल ते सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती .त्यामुळे ग्राम परिवर्तक राजू केंद्रे यांनी या विषयावर भर देऊन हे काम यशस्वी करण्यासाठी सलग दोन महिने मेहनत घेतली.
