लोहारा शहरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लहान 15 व 25 के.व्ही.चि विद्युत डि.पी.बसवण्यात यावी,अशा मागणीचे निवेदन शहरातील शेतकरी आयनोदीन सवार यांनी नायब तहसीलदार के.एम. देशटवाड मार्फत उर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे निवेद्वारे केली आहे.



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लहान 15 व 25 के.व्ही.चि विद्युत डि.पी.बसवण्यात यावी,अशा मागणीचे निवेदन शहरातील शेतकरी आयनोदीन सवार यांनी नायब तहसीलदार के.एम.
देशटवाड मार्फत उर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे निवेद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि,सद्या स्थितीला शेतीपंपासाठी लागणारी डि.पी.हे 100 के.व्ही.अशा क्षमतेची आहे.या डिपीवर 15 ते 20 डिमाँड धारक शेतकरी व दोन,चार डिमाँड नसलेले शेतकरी असतात.अशा डीपीच्या एल.टी.लाईनचा परिसर 100 हेक्टर ते 8 हेक्टर जमिनीवर फिरलेला असतो.
लहान 15 ते 25 के.व्ही.चा डि.पी.बसवल्यास शेती बिल भरणा होवुन वसुली चांगल्या प्रकारे होईल.व विजगळतीचे प्रमाणही कमी होईल.व एल.टी.
लाईनसाठी लागणारे खांब व केबल्सची बचत होईल.
अशा लहान डी.पी.ची देखभाल चांगल्या प्रकारे होईल.व तसेच शेतकऱ्याकडील थकीत बाकी व विज बिल हे सप्टेंबर महिन्यात वसुली चालु केल्यास चांगल्या प्रकारे शेतकरी सहकार्य करतील.कारण या कालावधीत शेतकऱ्याकडे मुग,सोयाबीन ही नगदी पिके निघालेले असतात.व पुढे रब्बी पिकांना त्यांना विजेची गरज असते.लहान क्षमतेच्या डि.पी.
बसवण्यात याव्यात,अशी मागणी निवेदनात केली आहे.या निवेदनावर आयनोदीन सवार,विरेंद्र नरुणे,
तानाजी माटे,दगडु माटे,युवराज सुरवसे,बिरुनाथ दुधभाते,आनंदगावकर,अदि शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post