- खाकटा येथील एकच पात्र लाभार्थी दानापूर सौंदळा परिसरातील शेतकरी संतप्त
प्रवीण वैष्णव
तेल्हारा दि. तेल्हारा तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाचा सर्वे चुकीचा झाला असून तालुक्यातील खाकटा येथील एकच लाभार्थी पात्र ठरविल्याने दानापूर सौंदळा परिसरातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांन मंध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे सर्वांचे सारखे नुकसान झाल्याने तालुक्यातून एकच पात्र लाभार्थी कसा ? यावरून प्रशासकीय अधिकारी यांच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे
दि.११ फेब्रुवारी रोजी तेल्हारा तालुक्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडका बसला गारपिटीने तालुक्यातील दानापूर,सौडला,खंडाला,चितलवाडी खाकटा आदि भागांमध्ये हरभरा गहू या रब्बी पिकासह संत्रा लिंबू केळी आंबा हे फळ पिके आणि कांदा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुसकान झाले.कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या पिंकाचे नुसकान झाल्याने शेतकरी बांधवांच्या हात तोंडाशी आलेला घास गारपिटीने हिसकावला त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला.दरम्यान जिल्याचे पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणा सोबत घेऊन गारपीट ग्रस्त भागाचा दौरा करून नुसकान ग्रस्त शेतकरी बांधवाना मदत देण्याचे आश्वासन दिले.ज्या प्रशासकीय यंत्रणे कडून सर्वे करण्यात आला. त्यांनी शेतकर्यांच्या पिंकांचे प्रचंड प्रमाणात नुसकान झाल्या नंतर हि सुद्धा तालुक्यातून खाकटा येथील शे.जाकीर शे.यारमोहम्मद एकच शेतकरी मदती साठी पात्र ठरविला खाकटा येथे गारपिटीने ज्या प्रमाणे नुकसान झाले त्याच प्रमाणे दानापूर सौदळा परिसरात सुद्धा नुकसान झाले नुकसान सारखे झाले तर निकष वेगवेगळे कसे असा प्रश्न निर्माण होत आहेत्यामुळे हा सर्वे म्हणजे शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे.यामध्ये हवालदिल झालेल्या शेतकर्यांच्या मदती बाबत राजकारण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.सबधित अधिकार्यांनी कुण्याच्या दवाबाखाली तर सर्वे केला नाही ना असा प्रश्न सुध्दा उपस्थित होऊ लागला आहे
त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील व जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन तालुक्यातील नुसकान ग्रस्त भागातील वंचित शेतकरी बांधवाना लाभ मिळून द्यावा व गारपीटग्रस्त ग्रस्त भागाचा पुन्हा सर्वे करावा अशी मांगणी होत आहे
