आगग्रस्त कुटुंबियांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील


नीलेश सूखसोहले

  •  आगग्रस्त कुटुंबियांची सहानुभूतीपूर्वक केली चौकशी
  •  आगग्रस्तांनी खचून जावू नये
  • शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल
  • आगग्रस्तांना घरकुल दिले जाईल


अकोला, दि. 24 --- माता नगरात लागलेल्या भीषण आगीमधील बाधित कुटुंबांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यामुळे आगग्रस्त कुटुंबांनी खचून जावू नये, असा दिलासा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज आगग्रस्त कुंटुबियांना दिला.
शहरातील मातानगर परिसरातील झोपडयांना गुरुवारी अचानक आग लागली होती. यामध्ये अनेक कुंटुबियांचे नुकसान झाले. आगग्रस्त कुंटुबियांची आज पालकमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले. यावेळी  माजी महापौर उज्ज्वलाताई देशमुख, माजी नगराध्यक्ष हरिष अलीमचंदानी, नगरसेवक आशिष पवित्रकार, डॉ. अशोक ओळंबे पाटील, पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी उज्ज्वल चोरे, तहसिलदार राजेश्वर हांडे, मनपाचे उपायुक्त दीपक पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री यांनी भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या घरांची पाहणी करुन आगबाधित कुंटुबियांची सहानुभूतीपूर्वक चौकशी केली. कुंटुबातील प्रत्येक सदस्याला भेटून त्यांना दिलासा दिला. ते म्हणाले की, आगीची घटना अत्यंत दुर्देवी आहे, या घटनेत ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी अजिबात खचून जाऊ नये, शासन आपल्या पाठीशी आहे. शासनाच्या निकषानुसार जास्तीत जास्त मदत आगग्रस्त कुंटुबियांना तातडीने मिळून देण्यात येईल. तसेच या कुंटुबियांना पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल देण्यासाठीही जलदगतीने कार्यवाही केली जाईल. ज्या ज्या सामाजिक संस्था, व्यक्तींनी आगग्रस्त कुटुंबियांना मदत केली, त्यांचे मी आभार मानतो.  

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post