पंकज सातपुते
कुरूम : विदर्भ व मराठवाडा विशेष दुध प्रकल्प (महादुध) प्रकल्प क्षेत्रातील कुरूम व माटोडा गावामध्ये गोचीड,गोमाशा नियंत्रणासाठी औषध फवारणी मोहिम दि.१५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात आली.यादरम्यान माटोडा येथे १५ फेब्रुवारीला पशुपालकांना गोचीड,गोमाशा पासुन जनावरांना होणारे आजार ,दुष्परिणाम व घ्यावयाची काळजी याबाबत कुरूम पशु वैद्यकिय अधिकारी डाँ.संजय घुगे यांनी मार्गदर्शन केले.तसेच माटोडा व कुरूम येथे दि.१६ ते १७ फेब्रुवारीला एकुण तिनशे जनावरांच्या गोठ्यामध्ये गोचीड ,गोमाशा निर्मुलनसाठी औषध फवारणी करण्यात आली यावेळी मोहिम यशस्वी करण्यासाठी एस.पी.मोकदम, डाँ.एस.एस.घुगे,वि.ए.देशमुख ,पी.पी.लांडे यांनी परिश्रम घेतले.
