- तहसीलदारांच्या कार्यवाहीने उडाली खळबळ - ज्वलंनशील पदार्थ घरात ठेवणे अंगलट आले
- न. पा. घरकुल आग प्रकरणी तहसीलदाार यांनी नोंदवीला गुन्हा
- तहसीलदारांच्या कार्यवाहीने उडाली खळबळ - ज्वलंनशील पदार्थ घरात ठेवणे अंगलट आले
मुर्तिजापूर प्रतिनीधी :- जुन्या षहरातील पठाणपूरा भागात न.पा. घरकुल टपा क्रमांक 1 मधील घरकुल क्रमांक एल 11 व एल 12 मध्ये सांयकाळी 6 . 15 वाजताच्या सुमारास अब्दुल जाकीर अब्दुल उस्मान वय 35 यांचे षासकीय घरकुल मध्ये भिशण आग लागली होती. सदर घरकुल त्यांनी स्वत: न वापरता भाडयाने षेख अयुब षेख युसुफ यांना दिल्याने ते सदर घरकुलात राहत आहे. सदर घरकुलात त्यांनी अवैध रित्या पेट्रोल, डिझल तसेचआॅईल या ज्वलनषील वस्तुंचा साठा केल्याने आग लागली व तीने उग्ररूप धारण केले त्यामुळे आजुबाजुच्या मालमत्तेला व लोंकाच्या जिवीताला धोका निर्माण झााला होता. या घटनेचा पंचनामा करण्यात येवून सदर दोशींवर तहसीलदार यांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस स्टेषनला तसेच वरिश्ठ अधिकारी यांना याबाबत कळविण्या आले आहे. सदर आग लागल्याने षेजारी राहत असलेल्या रीहानोद्यीन ग्यासोद्यीन यांचा मुलगा व पत्नी षबानाबी रीहानोद्यीन यांना ईजा झाली तसेच घरातील वस्तु जळून गेल्याने जवळपास दिड लाखापर्यंत नुकसान झाले. सदर घरकुलामध्ये राहणारा षेख अयुब षेख युसुफ व अब्दुल जाकीर अब्दुल उस्मान राहणार पठाणपूरा यांनी अवैधरीत्या अडीच ते तीनषे लीटर जीवनाषक वस्तुंचा साठा अवैध रीत्या करून ठेवला होता. व षासकीय घरकुलामध्ये राहत्या घरून विक्री करीत होते. त्यामुळे त्यांचे विरूध्द जीवनाष्यक वस्तु अधिनियम 1955 कलम 2 अन्वये गुन्हा तहसीलदार मुर्तिजापूर यांनी दाखल केला आहे. यामुळे खळबळ उडाली असून इतर ठिकाणी असेच साठे बाजी करून अवैधरीत्या विक्री करणा-यांनी सदर घटना घडताच आपआपले साठे हलविल्याची चर्चा आहे. तहसीलदार राहूल तायडे यांनी नागरीकांना जाहीर आव्हान केले आहे की त्यांनी अषाप्रकारे कुठेही अवैध रित्या जीवानाष्यक वस्तुंचा साठा आढळल्यास तात्काळ तहसील कार्यालयास कळवावे.
