![]() |
अकोला :- १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला .या संघात अकोला येथील आदित्य ठाकरेंचा समावेश होता.हे यश मिळाल्याबद्दल अकोला येथे काँग्रेस च्या वातीने आदित्य ठाकरेंचा त्याच्या निवासस्थानी जाऊन श्राल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.व तसेच पुढील जीवनात असेच मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त हो आणि अकोला जिल्हा चे नाव अजून मोठ्या प्रमाणावर उज्ज्वल करावे करीता सर्वांनी शुभेच्छा दिल्या .यावेळी माजी रणजी क्रिकेट खेळाडू व असंघटीत कामगार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष मो.बद्दरुजमा,जिल्हाकॉंग्रेस महासचिव राजेश भारती, लोकसभा युवककॉंग्रेस उपाध्यक्ष अंशुमन देशमुख,विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सचिव निनाद मानकर,विद्यार्थी काँग्रेस जिल्हाअध्यक्ष आकाश कावडे, युवक काँग्रेस महासचिव हैदर अली,विद्यार्थी काँग्रेस जिल्हा महासचिव अंकुश तायडे,नवनिर्वाचित विद्यपीठ छात्रसंग सचिव चैतन्य हिरपूरकर, सारंग शिंदे,रिजवानजमा,जय गिरहे,ऋषिकेश जामोदे,कुणाल झामरे, अभिजित पवार,अंकित कपले,निखील खोले, अंकुश शर्मा, करण पांडे आदींच्या संख्येने विद्यार्थी काँग्रेस चे पदाधिकारी व सद्स्य गण उपस्थित होते.
