मोर्णा स्वच्छता मोहिमेच्या आठव्या टप्प्यात अकोलेकरांचा उत्स्फुर्त सहभाग



  • अकोला अर्बन बँकेचे पदाधिकारी, विदयार्थी, वयोवृध्द नागरिकांनीही  केली  मोर्णाची स्वच्छता 
  •  सामाजिक संस्थेबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सहभागी
  •  पालकमंत्री ,महापौर सह लोकप्रतिनिधी , महसुल व मनपा कर्मचा-यांचा सहभाग 
  • सिटी कोतवाली ते दगडी पुलाच्या परिसरातील मोर्णाच्या काठावर केली स्वच्छता 
  • दर शनिवारी केली जाणार मोर्णाची स्वच्छता
  • अत्यंत शांततेत व शिस्तीत पार पाडली मोहिम

अकोला, दि. 24 –  मागील महिन्याच्या 13 तारखेपासून लोकसहभागातून सुरु झालेल्या मोर्णा स्वच्छता मोहिमेला अकोलेकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून अकोलेकरांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. या मोहिमेत आज अकोला अर्बन बँकेचे पदाधिकारी  आणि  कर्मचारी  तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे  सर्व पदाधिका-यांसह विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांनी  एकत्र येऊन सिटी कोतवाली ते दगडी पुलाच्या परिसरातील मोर्णाच्या काठावर स्वच्छता केली. विविध सामाजिक संस्था ,महसुल व मनपा कर्मचारी व अधिका-यांचा प्रचंड प्रतिसाद स्वच्छता मोहिमेला लाभला  आहे. 
नागरीकांसोबतच पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, महापौर विजय  अग्रवाल ,  माजी नगराध्यक्ष  हरिश अलिमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे, नगरसेवक आशिष पवित्रकार, अकोटचे  उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांचासह त्यांच्या अधिनस्त असलेले कर्मचारी ,उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे , तहसिलदार श्री. लोखंडे, गणेश मंडळाचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, अकोला अर्बन को.ऑपरेटिव्ह बँक कर्मचारी संघटनेचे  संदिप हातवळणे, समिर थोडगे यांच्यासह रयत सामाजिक संस्थेसह आज विविध सामाजिक संस्था ,महसुल व मनपा कर्मचारी व अधिका-यांचा तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यांचा प्रचंड प्रतिसाद स्वच्छता मोहिमेला लाभला  आहे. 
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नातून अकोल्याचे वैभव असणाऱ्या मोर्णा नदीची लोकसहभागातून झपाटयाने स्वच्छता होत आहे. मोर्णा स्वच्छता मिशनच्या आजच्या आठव्या  टप्प्याच्या मोहिमेसाठी त्यांनी नागरीकांना मोर्णा स्वच्छतेसाठी आवाहन केले होते, या आवाहनाला तितकाच भरभरुन प्रतिसाद देत मोर्णा काठी आज हजारो नागरीकांनी एकत्र येऊन मोर्णाची स्वच्छता केली. ही अकोलेकरांसाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे. 
दरम्यान आज सकाळी ठिक 8.00 वाजल्यापासून सिटी कोतवाली ते दगडी पुलाच्या परिसरातील मोर्णाच्या काठावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी जेसीबीव्दारे काढण्यात आलेला कचरा  नागरीकांनी  वाहनांमध्ये भरुन दिला.  अकोला अर्बन बँकेने  पोकलँडसाठी ज्या ग्राहकांना कर्ज दिले आहे त्यांनी आपले पोकलँड स्वच्छता मोहिमेसाठी विनामुल्य आज  उपलब्ध करून दिलेत.  
या मोहिमेत योगासन सांस्कृतिक मंडळाचे  सदस्य, माहेश्वरी समाजसेवा संघ,  संकल्प प्रतिष्ठाण , महाराणा प्रताप प्रगतीशील मंडळचे ॲड. सुभाष ठाकूर , ओम शांती आनंदमयी जीवनदायी जनकल्याण संस्था, निमाचे डॉ. आनंद चर्तुवेदी, डॉ. मिलींद बडगुजर , डॉ. वर्षा बडगुजर , डॉ. अरविंद गुप्ता, डॉ. लोटे, डॉ. संजय तोष्णीवाल, अकोला जनता बँक महिला संचालक सदस्य व कर्मचारी,   जुने शहर, भावसार महिला मंडळ , लघुव्यवसायी व्यापारी संघटना,  सेवा फाउंडेशन , शौर्य असोसिएशन ,  संत गाडगेबाबा आपातकालीन पथक पिंजर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, जिल्हा सेवा समिती ,  लोकसेवा संघ, क्रिडा भारती,  सहेली महिला बहुउददेशीय संस्था,  नॅशनल  मोबाईल  मेडिकल युनिट ,बारा ज्योतीलिंग  योगाक्लास , गव्यम सोशल वेलफेअर सोसायटी  यांच्यासह व्यापारी, बचतगटाच्या महिला, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी/कर्मचारी, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत, वयोवृध्द नागरिक, विदयार्थी आणि सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले होते. केवळ अकोला शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातून अनेकजण स्वच्छतेसाठी पुढे येवून आपला  सक्रीय सहभाग नोंदविला. श्रमदान करणा-या नागरिकांना  प्रोत्साहन देण्यासाठी   शैक्षणिक  गुणवत्ता विकास केंद्राचे समन्वयक प्रकाश अंधारे तसेच उपविभागीय  अधिकारी कार्यालयाचे श्री. नाईक , निलेश मगर यांचे  सक्रीय  योगदान लाभले.
तसेच गांधी चौक नवयुवक मंडळ, लालबाग गणेश मंडळ माळीपुरा  धनश्री महिला बचतगट ,  प्राथमिक  आरोग्य केंद्र कापशी , अग्नीपंख  बहुउददेशिय संस्था , राजेश्वर आरती मंडळ, महाराष्ट सेवा समिती,  नामदेव महाराज सेवा समिती , स्त्रीधन महिला बचतगट, नारायण खरबडकार मित्रमंडळ, पराग गवई मित्रमंडळ,  पुलिस पाटील संघटना, महसुल कर्मचारी संघटना, अकोट उपविभाग महसूल संघटना,  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे  एनएसएसचे विदयार्थी , सिताबाई आर्ट कॉलेजचे विदयार्थी , विदर्भ पटवारी संघटना, मंडल अधिकारी संघटना सह मनपाचे  अतिरिक्त आयुक्त दिपक पाटील, शहर अभियंता श्री. खान , मनपाचे कैलास पुंडे,  आरोग्य निरिक्षक विनीत पांडे, आशिष इंगोले, झोन अधिकारी  वाय.यू. वाघाळकर,   महाराष्ट राज्य शहर व ग्रामीण पत्रकार संघाचे संजय  देशमुख  यांनी मोर्णा स्वच्छतेमध्ये सहभागी होवून श्रमदान केले.
महिला दिनानिमित्य महिलांमध्ये  मतदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी  जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली  नायब तहसिलदार सतिश काळे , श्री. कोरकणे, श्री . वैद्य यांनी  मतदान जनजागृती मोहिम  महिलांना मार्गदर्शन करून  राबविली. 
नदीच्या ठिकाणी  सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छते अंतर्गत करावयाच्या बाबींचे परिपूर्ण नियोजन जिल्हा प्रशासन आणि मनपा व पोलीस प्रशासनाने केले होते. त्यामुळे सहभागी सर्वांनीच कुठलीही भीती न बाळगता स्वयंस्फुर्तीने नदी काठावरील कचरा हिरीरीने ट्रॅक्टर  व घंटागाडीत टाकला. मोर्णा स्वच्छ झालीच पाहिजे या भावनेतून सर्वजण मन लावून काम करताना दिसत होते. विशेष म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार  किंवा दुर्घटना न घडता ही मोहिम खूपच शिस्तबध्दपणे व शांततेने पार पडली.  

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post