सोलापूर शहर राष्ट्रवादी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रियेला झाला प्रारंभ

४ मार्चला प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत शहर अध्यक्षांची होणार  निवड
सोलापूर - ( प्रतिनिधी  ) - सोलापूर शहर राष्ट्रवादी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.रविवार २५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे शहर निवडणूक अधिकारी प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत सकाळी ९ वाजत शासकीय विश्रामगृहात निवडी होणार आहेत.ज्यामध्ये सोलापुरातील तीनही विधानसभा मतदार संघातील सहा शहर ब्लॉक अध्यक्ष,तीन विधानसभा अध्यक्ष,नऊ प्रांतिक प्रतिनिधींची निवड करण्यात येणार आहे ४ मार्च २०१८ रोजी सोलापूर शहर अध्यक्षांची निवडही निवडणूक अधिकारी प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.दरम्यान ११ फेब्रुवारीपासून निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे.शहरातून क्रियाशील सदस्यांची अंतिम मंजुरी घेऊन प्रदेशला मंजुरीसाठी पाठवून देण्यात आली आहे.तसेच १८ फेब्रुवारी रोजी शहरातील २६ प्रभाग अध्यक्षांची एकमताने निवड करण्यात आली आहे.निवडणूक अधिकारी प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या निवडीसाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post