मुर्तिजापूर( प्रतिनीधी ) येथील जुने शहर भागात सांयकाळी 6 वाजताच्या सुमारास दोन घरकुलांमध्ये भडकलेल्या आगीमध्ये दोन्ही घरकुल जळून खाक झााली तर या आगी मध्ये एक लहान बालकासह एक इसम मिळून दोघे जण जखमी झाले. आग लागल्याचे समजताच अनेकांनी घटना स्थळाकडे धाव घेतली होती. आगीची भीषणता पाहता सुदैवाने कोणतीही प्राणहाणी झाली नाही. नाहीतर एखादी अप्रिय घटना घडण्याचा धोका निर्माण झाला होता. सदर आग लागण्याच्या कारणाबाबत विविध तर्कवितर्क वर्तवील्या जात होते.जुने शहर भागातील घरकुल टप्पा क्रमांक 1 मधील घरकुल क्रमांक एल 11 व एल 12 मध्ये आज दिनांक 21 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याचे निदर्शननास आले असता चांगलीच धावपळ उडाली. आगीची भिषणता पाहता आजूबाजूच्या घरकुलातील रहीवाशांनी जीवमुठीत धरून पळ काढला.
सदर आग लागण्यामागील कारण अद्याप स्पश्ट झाले नाही. आगीची माहिती मिळताच तहसीलदार राहूल तायडे व नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ हे तहसील कार्यालयातील आग विझविण्याचे छेाटे तीन ते चार सिलंेटर घेवून मोटारसायकलने घटना स्थळी पोहचले होते. परंतु आगीची भिषणता पाहता तात्काळ मुर्तिजापूर, दर्यापूर, कारंजा येथील अग्निशमन दलास याबाबत कळविण्यात आले. मुर्तिजापूर येथील अग्निशमन घटनास्थळी आली परंतु तीचा काहीच फायदा आग विझविण्याच्यासाठी झाला नाही. त्यानंतर स्थानिक पाण्याचे टॅंकर व माती टाकून लोकांनी आग विझविण्यासाठी मदत केली. दर्यापूर येथील अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आली. त्यानंतर कारंजा येथील अग्निशनम दलाची गाडी पोहचली होती. लहानशा घरकुलात जवळपास दीडतास आग धगधगत होती. त्यामुळे सदर घरात ऐवढी मोठी आग लागण्यामागील कारण ज्वलनशील पदार्थ असल्याची चर्चा सुरू होती. घटनास्थळी आमदार हरिष पिंपळे तसेच नगर सेवक, सामाजीक कार्यकर्ते यांनी धाव घेवून आग विझविण्यासाठी मदत केली.यााआगीत शेेेेख अयुुुुब शेेेख युुुसूफ वय 35 व अबदुुुल साहिल अ.सत्तार वय 15 हेे जखमी झाले. पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.

