इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरात ऊस वाहतुक करणारे टँक्टरच्या गाण्याच्या कर्कश आवाजामुळे व प्रदुषणामुळे नागरीकांना मोठा त्रास होत आहे.तरी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी,अशा मागणीचे निवेदन शहरातील युवकांनी लोहारा पोलीस ठाण्यात दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे कि,शहरातील मुख्य रस्त्याच्या बाजूला बाजार पेठ आहे.यामुळे मेनरोड वर रहदारी चे प्रमाण वाढले आहे.या रस्त्यावरुन ऊस वाहातुक करणारे ट्रक्टर चे प्रमाण जास्त आहे.पण ट्रक्टर वरील गाणी मोठ-मोठ्या आवाजाने वाजवली जातात.या ट्रक्टर वरील गाण्याचा आवाज इतका जोरात असतो कि पाठीमागील वाहांनाचा हाँर्न चा आवाज ट्रक्टर ड्रायव्हर ला ऐकायला पण येत नाही. ट्रक्टरला डबल ट्रॉली असल्यामुळे पाठीमागील वाहनाचा अदांज लागत नाही.या रोड लगत दवाखाने आहेत.या कर्कश आवाजाचा रूग्णांना,नागरिकांना तसेच दुकानदांराना मोठ्या त्रास होत आहे.तसेच दुचाकी वाहानांना मोठ्या प्रमाणात LED फोकस लाईट लावल्यामुळे समोरील वाहनांला त्रास दायक ठरत आहे.तरी संबंधित वाहानावार योग्य ती कार्यवाही करावी असी मागणी निवेदनात केली आहे.या निवेदनावर परमेश्वर चिकटे,गणेश हिप्परगेकर, तम्मां स्वामी,अदित्य स्वामी,गणेश कमलापुरे,मिलिंद बंगले यांच्या सह्या आहेत.
