गावांच्या गरजा नुसार विकास कामांना प्राधान्य ! सहकार राज्य मंत्री ना. गुलाबराव पाटील


   जळगाव, दि. 22 – गावांचा सर्वागीण विकासांचे नियोजन करतांना गांवाच्या निकडीच्या गरजे नुसार विकास कामांना प्राध्यान्यक्रम दिला जातो. असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज निमगाव येथे केले. त्यांच्या हस्ते आज सकाळी निमगाव-बेळी 1 कि.मी रस्त्याचे भूमीपूजन झाले त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.सदर रस्त्यासाठी आमदार निधीतून 10 लक्ष निधी मंजूर करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य लालचंद पाटील होते.व्यासपीठावर गजानन पाटील, नानाभाऊ सोनवणे, संजय नाले, , विकास भाऊ धनगर, दगडू भाऊ माळी, चेतन बऱ्हाटे, राजुभाऊ रोटे, आदि मान्यवर उपस्थित होते  मा. पाटील पुढे म्हणाले की, निमगाव बेळी दरम्यान दळणवळण चांगले व्हावे यासाठी नाबार्ड मार्फेत नदीवर मोरीचे बांधकाम करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत तसेच या गावात एस टी बस सेवा सुरु करण्यांत येईल .  गावातील तरुणांना शरीर सौष्ठव तयार करण्यासाठी व्यायामाचे साहित्य करीता रु. 10 हजार रोख देणगी ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन ना. पाटील यांनी अभिवादन केले. या कार्यक्रमांत जिल्हा परिषद सदस्य लालाचंद पाटील यांचे समुयोचित भाषण झाले. सरपंच सौ. प्रियंका रविंद्र पाटील,  रविंद्र पाटील यांनी ना. पाटील यांचे शाल श्रीफळ पुष्पहार देवून स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन कृषि सहाय्यक सचिन बाविस्कर तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक गिरीष चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमास उपसरपंच महेंद्र मगरे, ग्रामपंचायत सदस्य युवराज पाटील, हेमराज पाटील, युवराज धनगर, गणेशभाऊ राजपुत, विनोद पाटील, ज्ञानदेव महाजन, चंद्रगुप्त मगरे, विलास पाटील, दिलीप पाटील, प्रमोद भाऊ राजपुत, चंद्रकांत ढाके, आत्माराम शिरोळे, ग्रामस्थ विद्यार्थी, अबाल वृध्द मोठया संख्येने उपस्थित होते.                                                        

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post