![]() |
अतुल नवघरे
लाखपुरी :- मुर्तीजापुर येतील ब्रम्ही गावा मध्ये लायब्ररी च्या गटा मध्ये मुलाना आज खंग्रास चंद्र म्हणजे अवकाशीय घटना या बदल माहीती दे०यात आली मानवासाठी नेहमीच अविस्मरणीय असतात. अशीच एक दुर्मिळ घटना येत्या बुधवारी अवकाशात घडून येत आहे. माघ पोर्णिमा अर्थात ३१ जानेवारी २०१८ रोजी अवकाशात खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून), सुपरमून आणि ब्लूमून असा तिहेरी संगम एकाच वेळी घडून येईल. या दिवशी चंद्र पृथ्वीपासून सुमारे 3 लाख ५८ हजार किलोमिटर अंतरावर येईल त्यामुळे नेहमीपेक्षा १४ टक्के मोठा तर ३० टक्के अधिक तेजस्वी दिसेल. हा अवकाशीय सोहळा कोल्हापूर मधून उत्तम प्रकारे दिसू शकेल. महत्वाचे म्हणजे उघड्या डोळ्यांनी पण या घटनेचा आनंद लुटता येणार आहे. ३१ मार्च १८६६ नंतर पहिल्यांदाच म्हणजे तब्बल १५२ वर्षांनी असा योग जुळून येत आहे .सुपरमून म्हणजे काय चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लाख ८४ हजार किलोमिटर इतक्या अंतरावर असतो. पण, चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने भ्रमण करीत असल्यामुळे कधी पृथ्वीच्या जवळ (perigee) तर कधी दूर (apogee) जातो. ज्यावेळी पौर्णिमेचा किंवा अमावस्येचा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ अंतरावर येतो तेंव्हा त्या घटनेला सुपरमून असे म्हटले जाते. अशा स्थितीत चंद्र नेहमी पेक्षा मोठा व तेजस्वी दिसतो. वर्षातून काही वेळा सुपरमून घडून येत असते. या पूर्वीचे सुपरमून याच महिन्यात १ तारखेला झाले होते.ब्लुमून म्हणजे काय सर्व साधारणपणे एका महिन्यात एक पोर्णिमा व एक अमावस्या असते. पण जेंव्हा एकाच महिन्यात दोन पोर्णिमा येतात तेंव्हा त्या दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लुमून असे म्हटले जाते. ब्लुमून च्या वेळी चंद्र नेहमी सारखाच असतो, त्याचा रंग निळसर वगैरे असा काही नसतो. ब्लड मून म्हणजे काय सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ज्यावेळी एका सरळ रेषेत आणि प्रतलात येतात त्यावेळी ग्रहण होते. अशा वेळी जेंव्हा चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून (Umbra) जातो तेंव्हा प्रकाश किरणांचे विकीरण होते व बहुतांश निळ्या रंगाच्या छटा शोषल्या जावून नारंगी लाल रंग तेवढाच शिल्लक राहतो. यामुळे चंद्र गडद छायेत असताना म्हणजे खग्रास स्थितीत असताना लालसर नारंगी दिसतो. चंद्राच्या या स्थितीला ब्लड मून असे म्हणतात. या नंतरचे खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून) २७ जुलै २०१८ रोजी होईल. बुधवारी ३१ तारखेला या तीनही गोष्टी एकाच वेळी घडून येत आहेत. त्यामुळे या घटनेला खगोलशास्त्रीय दृष्ट्या विशेष असे महत्व आहे. ही माहिती देण्यात आली .
