![]() |
प्रवीण वैष्णव
- शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
तेल्हारा :- महाराष्ट्र शासनाने नाफेड मार्फत शेतकर्यांनाची तूर खरेदी करण्याबाबत खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे अशी मागणी तेल्हारा तालुका शिवसेनेचा वतीने तहसीलदार तेल्हारा यांचामार्फत जिल्हाधिकारी अकोला यांचाकडे 1 फेब्रुवारी ला निवेदन देऊन मागणी करण्यात आली आजपर्यंत जवळपास 2 हजार शेतकरी बांधवानी नाफेड मार्फत तूर खरेदी करावी यासाठी शासनाने जाहीर केल्या प्रमाणे नाफेड मार्फत नाव नोंदणी केली शासनाने 1 फेब्रुवारी पासून तूर खरेदी करण्यात येणार असे जाहीर केले होते परंतु अद्याप पर्यंत नाफेड मार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही यामुळे गरजू शेतकऱ्यांची व्यापाऱ्यां मार्फत कमी भावाने तूर खरेदी करून लुट केली जात आहे शासनाचा या दिरंगाईमुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे शासनाने शेतकरी बांधवांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नाफेड चे तूर खरेदी केंद्र विना विलंब सुरू करावे अन्यथा शेतकऱ्यांचा हितार्थ शिवसेनेचा वतीने आंदोलन छेडण्यात येणार अशे निवेदन शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड यांचा नेतृत्वात जिल्हाधिकारी अकोला यांना देण्यात आले निवेदनावर शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड शहर प्रमुख विजय मोहोड प्रसिध्द प्रमुख प्रवीण वैष्णव रामभाऊ फाटकर विवेक खारोडे संजय आढाउ गणेश तीव्हाणे निलेश धनभर संदीप आवारे संतोष राठी पुरुषोत्तम गावंडे विक्की धांडे विट्ठल जोशी विक्रम खोटरे दिपलाल वडतकार शिवा सोनटक्के नागेश शेळके राम वाकोडे शुभम सोनटक्के इत्यादी सह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा स्वाक्षऱ्या आहेत .
