तेल्हारा येथे शिवसेना जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न


तेल्हारा :- स्थानिक श्री लटीयाल भवानी प्रतिष्ठान येथे शिवसेना जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा दि.२५ फेब्रुवारी रोजी आमदार गोपीकिशन बाजोरिया साहेब यांच्या हस्ते तर माजी आमदार संजय गावंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन बाप्पू देशमुख ,उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे ,युवासेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप यांची ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप गुरखुद्दे ,तालुका प्रमुख विजय  मोहोड ,माजी तालुका प्रमुख शंकरराव ताथोड ,माजी तालुका प्रमुख बंडू भाऊ रुद्रकर ,शहर प्रमुख विक्रांत शिंदे ,आदि मान्यवर उपस्थितीत होते .यावेळी उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी अकोट तेल्हारा हिवरखेड साठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी आ.गोपीकिशन बाजोरिया यांना केली . तर माजी आमदार संजय गावंडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलले कि अकोट तेल्हारा मतदार संघातील  शिवसैनिकांनी या मतदार संघात प्रत्येक घरात शिवसेना पोहचवून जनतेची सेवा करावी असे आव्हान केले .
पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून गोर गरीबाची जनतेची ,शेतकऱ्यांची ,मजुरांचे प्रश्न सोडवण्याची कार्यकर्त्यांनी काम करावे .असे आव्हाहन जिल्हा प्रमुख नितीन बाप्पू देशमुख यांनी केले,तर आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी वित्त मंत्रालय कडून परवानगी घेऊन अकोट तेल्हा मतदार संघात अकोट हिवरखेड तेल्हारा येथे रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले व जिल्हा परिषद ,विधानसभा,लोकसभा ,च्या निवडणुकीच्या भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने मोर्चे बांधणी करावी असे आवाहन केले .
यानंतर तेल्हारा शहरातील विविध भागातील तरुणांनी युवासेना मध्ये प्रवेश घेतला त्या मध्ये स्वप्नील सुरे ,विठ्ठल मानकर ,अमित घोडेस्वार ,निलेश निवाने ,आकाश फाटकर ,दीपक तिकार ,अभिजित लासूरकर ,पावन झाप्रडे ,शाम ओळंबे ,वैभव मानकर, अमोक अकोटकर ,देवानंद बायड .कमलेश बायड ,सुदर्शन नंदाने ,जितेंद्र पवार ,सुनील गोयल ,अभिजित थाटे ,आशुतोष वाघ ,विठल चव्हाण ,कृष्णकांत नेमाडे ,रोहित अग्रवाल ,प्रेम वर्मा , सागर निर्मळ, इ कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश युवासेने मध्ये घेतला .
            त्या नंतर आमदार गोपीकिशन बाजोरिया याच्या हस्ते शिवसेनेला निशुल्क कार्यालय उपलब्ध करून दिल्या बद्दल  तेल्हारा तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव याचा सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर तेल्हारा शहरातील युवावक्ते सचिन थाटे ज्यांनी प्रत्येक घरात शिवाजी शिवाजी महाराज याच्या जीवन वर व्याख्यान करून प्रत्येक घरात शिवाजी महाराजांचे विचार पोहचवत आहे त्या बद्दल त्याचा सर्व मान्यवरांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला .नवनियुक्त युवासेना पदाधिकारी यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला त्या मध्ये नवनियुक्त तेल्हारा युवासेना तालुका प्रमुख जयवंत चिकटे, तेल्हारा तालुका समन्वयक बंटी राऊत ,तेल्हारा तालुका उपप्रमुख युवासेना मुन्ना पाथ्रीकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात  आला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रवीण वैष्णव प्रसिद्धी प्रमुख व युवासेना शहर प्रमुख सचिन थाटे यांनी केले .
प्रस्थाविक शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड यांनी केले .व आभार प्रदर्शन शिवसेना शहर व तालुका याच्या वतीने रामा भाऊ फाटकर यांनी केले .
यावेळी तालुका प्रमुख विजय मोहोड ,शहर प्रमुख विक्रांत शिंदे ,प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव ,राम भाऊ फाटकर ,शंकरराव ताथोड ,बंदडू रुद्र्कर ,आश्रूड निभोरकर ,विठल जोशी उप तालुका प्रमुख ,संजय अडाऊ ,उप तालुका प्रमुख ,शिवा कुकडे ,विक्की धांडे,विवेक खरोडे ,गणेश धामोदे ,नागेश शेळके ,ज्ञानेश्वर आखरे ,नितीन बाळापुरे ,भास्कर कोरडे ,रवींद्र बाजोरे ,संदीप आवारे ,नितीन आखरे ,सुधी पाथ्रीकर ,दिनेश कुकडे  रफू भाई ,
  त्याच बरोबर तेल्हारा शहरातील माजी शहर प्रमुख राजेश वानखडे , पप्पू सोनटक्के ,निलेश धनभर ,जयंत गावंडे ,गाजणा सोनटक्के ,गजानन मोरखडे ,संतोष राठी ,हेमंत अवचार ,नागो मुर्हेकर उप शहर,शाम राहतोले ,पप्पू कामटे , प्रमुख अमर ठाकूर  युवासेना चे तालुका प्रमुख जयवंत चिकटे ,तालुका समन्वय बंटी राऊत , युवासेना तालुका उपप्रमुख मुन्ना पाथ्रीकर ,तेल्हारा युवासेना शहर प्रमुख सचिन थाटे ,किशोर डमरे ,सुरज काइंगे  , दिनेश रत्नपारखी ,राहुल झाप्रडे ,स्वनिल सुरे ,मनीष गावळी ,याच्या समवेत आजी माजी पदाधिकारी व समस्त शेकडो शिवसैनिक उपस्थितीत होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post