शासनाची दिशाभूल करून अनुदान लाटणाऱ्या शेतकरी घोरमोडे,तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

 मूर्तीजापुर/ दि.२४/ तालुका प्रतिनिधी/ येथून जवळच येत असलेल्या तालुक्यातील मौजे उनखेड येथील गांवकरी मंडळी यांनी एक तक्रार उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाने यांच्या कडे दि.२३ फेब्रुवारी रोजी देवुन  उनखेड येथील शेतकरी देविदास भाऊराव घोरमोडे  यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या जनता दरबारात बोंड अळीचा सर्वे करून अनुदान मिळणे बाबत निवेदन सादर केला होता. दि.१६ फेब्रुवारी २०१८ रोजी पटवारी नेतनराव,मंडळ अधिकारी जाधव, कूषी सहाय्यक शेळके यांनी देवीदास घोरमोडे यांच्या शेतात जाऊन पंचनामा केला असता त्यांना सदर शेत गट क्रमांक १५३उनखेड मध्ये कपाशी आढळून आली नाही. त्या शेतात हरभरा पिक असुन त्याचे फोटो पटवारी व कूषी सहायक यांचे कडे आहे. सदरच्या शेतात कोणत्याही प्रकारचा कपाशीचा पेरा नसुन सुध्दा पटवारी व मंडळ अधिकारी यांनी देवीदास घोरमोडे यांच्याशी संगणमत करून त्याच्या स्वयंघोषणा पत्राद्वारे सन २०१७ /१८ चा पेरा कपाशीचा दाखवून शासनाची दिशाभूल करून शासकीय अनुदान लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे.ज्या दिवशी पटवारी,मंडळ अधिकारी यांनी सदर शेतात पंचनामा केला. त्या दिवशी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य गावात हजर असुन ही त्यांना माहिती न देता पंचनामा करण्यात आला. सदर क्षेत्र गट क्रमांक १५३ देवीदास घोरमोडे यांचे शेतात कोणत्याही प्रकारचा कपाशी पेरा नाही. त्यात हरभरा पेरलेला असुन पटवारी व मंडळ अधिकारी यांनी त्याच्या शी संगणमत चूकीचे पेरेपत्रक बनवून व शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी त्यांच्या वर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना पदावरून निलंबित करण्यात यावे व सदर प्रकरणाची मा हीती़ तहसीलदार राहुल तायडे यांना दे्वुन
हि ते  हेतूपरस्पर व जाणीव पूर्वक
हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे.  ते पदाचा दूरूपयोग करीत आहे. असे दिलेल्या निवेदनात नमूद आहे.सदर शेतकरी देवीदास घोरमोडे यांचे वर शासनाची दिशाभूल व फसवणूक करून अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला असुन त्याच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात यावे.आणि मौजे उनखेड येथील देवीदास घोरमोडे यांचे शेताचा उपविभागीय अधिकारीयांचे समोर प्रत्येक्ष पोलीस पाटील, सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सचिव, याचे समक्ष पून्हा पंचनामा करण्यात यावा.या प्रकरणात  कार्यवाही न झालेल्यास पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर श्याम प्रभाकर टिपरे, सरपंच प्रशांत इंगळे गट ग्रामपंचायत रंभापूर , धम्म पाल वानखडे, गुलाबराव इंगळे, दिनेश गिरी, दिपक ईंगळे,नितीन बंगाले, राहूल इंगळे यांच्या स्वाक्षरी आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post