प्रक्रिया सुटसुटीत पद्धतीने राबवुन जास्तीत जास्त जनजागृती करावी युवासेनेची मागणी


शिक्षणधिकारी यांना युवासेनेने धरले धारेवर
अकोला : राज्यामध्ये सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी २५ आर.टी.ई. राखीव प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या प्रक्रियेनुसार पालक विद्याथ्र्यांसाठी २५%आर.टी.ई. राखील कोट्यातुन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असते. या प्रकिये बाबत पालक विद्याथ्र्यांना कल्पना नसते. या राखीव कोट्यात फॉर्म भरण्याची मुदत कोणती? फॉर्म कसा भरावा ? शाळा कशी निवडावी ? त्याचे नियम, अटी, लागणारी कागदपत्रे या बाबत संभ्रम पालक व विद्याथ्र्यांमध्ये असतो. याचा लाभ ज्या पालक विद्याथ्र्यांना मिळाला पाहिजे ते या पासुन वंचित राहतात. शासनाच्या माध्यमातुन काढण्यात आलेल्या आर.टी.ई. २५ %प्रक्रियेचा लाभ जास्तीत जास्त सामान्य कुटुंबातील पालकांना झाला पाहिजे. या साठी २५%आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया ही सुटसुटीत राबविणे खुप गरजेचे आहे. त्यावर जन जागृती होणे देखील गरजेचे असुन या मध्ये येणाNया इंग्लिश माध्यम शाळांची नांवे ठिकठिकाणी या बाबत जन जागृती होणे गरजेचे आहे.
अकोला शहरातील, जिल्ह्यातील काही महत्वाच्या शाळांची नांवे या प्रक्रिये मध्ये नसतात.
ते का नाही, या बाबत देखील माहिती पालकांना व्हावी म्हणुन तसे माहितीपत्रक ठिकठिकाणी लावले गेले पाहिजे अश अनुषंगाने आज युवासेनेच्या माध्यमातुन शिक्षणधिकारी यांना निवेदन देउâन युवासेना जिल्हाधिकारी विठ्ठल सरप पाटील यांनी त्यांना धारेवर धरले सर्व सामान्य शेतकNयांच्या मुलां तुम्ही चांगल्या पध्दतीने जनजागृती करâन त्यांना शिक्षण दिले पाहिजे या योजनेचा लाभ सर्व सामान्य गोर गरीब विद्याथ्र्याना मिळाले पाहिजे पण शिक्षणधिकाNयांनी जनजागृती न करता माणुसकीचा कळस तयार केला आहे, आज महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत त्यांचा मुलांकडे शिक्षणासाठी भांडवल नाही शासनाच्या माध्यमातुन ते पुर्ण करण्याचे काम शासन करत आहे, पण मात्र अधिकारी त्यांना शिकू देत नाहीये हे सर्व घटनेचा विठ्ठल सरप पाटील यांनी शिक्षणधिकारी यांना चांगलाच जाब विचारला.
युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांनी माहिती दिली की, सन २०१८-१९ शैैक्षणिक वर्षातील २५ %आर.टी.ई. प्रवेश प्रक्रियेसाठी १० फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. पालकांना शिक्षण विभागा तर्फे ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत आव्हान करण्यात आलेले आहे. नुसते आव्हान न करता या बाबत ठोस पावले उचलुन जास्तीत जास्त अर्ज कसे भरले जाणार व सामान्य नागरिकांना त्यांचा हक्क कसा मिळेल. त्यासाठी प्रयत्न करावे. या निणNयानुसार २५%राखीव जागांमध्ये विद्याथ्र्यांचे १ ली साठी मोफत प्रवेश होत असतो. यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे खुप गरजेचे आहे. पालक व विद्याथ्र्यांनी  www.student.maharashtra.gov.in या संकेत स्थळा वरून प्रवेश अर्ज दिनांक १०/०२/२०१८ ते २८/०२/२०१८ या कालावधीत भरणे गरजेचे आहे. पालकांनी आर.टी.ई. २५ %अंतर्गत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरतांना जास्तीत जास्त कोणत्याही १० शाळा निवडाव्यात असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील,जिल्हा समन्वयक कुणाल पिंजरकर,निखिल सिंह ठाकुर ,शहर प्रमुख नितिन मिश्रा ,उपजिल्हा प्रमुख दीपक बोचरे,तालुका प्रमुख आस्तिक चव्हान व युवा सैनिक उपश्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post