![]() |
आगरतळा :- त्रिपुरामधील कम्युनिस्ट सरकार दलित आदिवासिंचा केवळ निवडणुका जिंकण्यासाठी वापर करीत आहे मात्र निवडणूका जिंकून सत्तेत आल्यानंतर दलित आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे कम्युनिस्ट सरकार दुर्लक्ष करीत आहे. मागील 25 वर्ष त्रिपुरात सत्तेत असलेल्या कम्युनिस्टांनी दलित आदिवासींचा नोकरीतील अनुशेष सुद्धा भरलेला नाही. दलित आदिवासींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या त्रीपुरातील कम्युनिस्टांचे सरकार उलथवून टाका असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार राजू दास हे सुराज्यामणीनगर या विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढत आहेत त्यांच्या प्रचारसभेत ना रामदास आठवले बोलत होते. यावेळी ईशान्य भारत रिपाइं चे प्रभारी निरीक्षक विनोद निकाळजे ; रिपाइंचे त्रिपुरा अध्यक्ष ऍड. बी सी दास आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.त्रिपुरा विधानसभेच्या एकूण 60 जागा असून 59 जागांवर रिपब्लिकन पक्षाने भाजपला पाठिंबा दिला असून एका जागेवर रिपब्लिकन पक्ष निवडणूक लढत आहे.त्रिपुरा मध्ये दलित आदिवासींच्या हितासाठी कम्युनिस्टांचे सरकार उलथवून लावावे लागेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपला रिपाइं चे एनडीए चा घटक पक्ष म्हणून त्रिपुरात सत्तांतर घडविण्यासाठी भाजप ला रिपाइंचे समर्थन असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले. दलित आदिवासींच्या हितासाठी कम्युनिस्टांचे सरकार उलथविणे गरजेचे असून त्यासाठी भाजपला बहुमताने समर्थन देण्याचे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.
यावेळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरील गितमाला या पुस्तकाचे उदघाटन ना रामदास आठवलेंच्या हस्ते करण्यात आले.
