![]() |
प्रवीण वैष्णव
तेल्हारा :- शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर परिषद संदर्भात पच्शिम विदर्भातील महत्वपूर्ण बैठक नागपूर येथील मुख्यमंत्री निवास रामगीरी येथे ४फेब्रुवारी ला पारिवारिक बैठक घेवून तेल्हारा शहरासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले .या पारिवारिक बैठकीत पाचहि जिल्ह्याचे भाजप जिल्हद्यक्ष पालकमंत्री आमदार महाराष्ट्र सरचिटणीस विदर्भाचे संघटन मंत्री नगराध्यक्ष सर्वांची उपस्थिती होती .या बैठकीमध्ये विदर्भातील प्रत्येक नगर पालिकेचा आढावा घेण्यात आला .यामध्ये तेल्हारा नगराध्यक्षा जयश्री ताई फुंडकर यांनी शहरातील समस्यांची व त्यावर उपाय यौजनेबाबत चर्चा केली .यामध्ये हद्दवाढ , पाणीपुरवठा , स्मशानभूमी, बाजारपेठ , सांस्क्रुतिक कलामंच , सोलर प्लांट आणि न .प .हद्दीतील जाणारा महामार्गावरील गौतमा नदीचा पूल तसेच I.S.D.P.घरकूल मधील वाढीव निधी संदर्भात चर्चा केली .शहरातील बायपासचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत विनंती केली .या वेळी मुख्यमंत्री यांनी घनकचरा अभियान पाणीपुरवठा व घरकूल योजना यावर भर दिला .व वीदर्भासह तेल्हारा शहराला भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले .यावेळी बैठकीला व्ही. सतीशजी पश्चिम विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र जी कोठिकर महाराष्ट्र संघटन मंत्री , रामदासजी आंबटकर ना .रणजीत पाटील , ना .प्रवीण पोटे , राजेंद्र पाटनी , तेजराव थोरात आ .प्रकाश भारसाकळे आ . हरीश पिंपळे आ .आकाश फुंडकर आ .रमेश बुंदिले आ .चैनसूख संचेती पश्चिम विदर्भातील सर्व आमदार प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .
