![]() |
राजेश वालकर
पूर्णा प्रतिनिधी :- तालुक्यातील बरबडी येथे शिवसेनेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त, दिवस रात्र खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन 3 फेब्रुवारी पासून करण्यात आले आहे ,प्रकाश झोतात होणाऱ्या स्पर्धांचे उद्घाटन 3 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता खा संजय जाधव यांच्या हस्ते होणार असून यावेळी विधानसभा प्रमुख संतोष मुरकुटे, नगराध्यक्षा सौ,गंगाबाई एकलारे,जी प सदस्य, राजू चापके ,तालुकाप्रमुख काशीनाथ काळबांडे ,शहरप्रमुख नितीन कदम,हे उपस्थित राहणार असून प्रथम येणाऱ्या संघास खा संजय जाधव यांच्या वतीने 31हजार रुपये द्वितीय संघास संतोष मुरकुटे यांच्या वतीने 21 हजार रुपये तृतीय संघास नितीन कदम यांच्या वतीने,13 हजार रुपये तर जी प सदस्य राजू चापके यांच्या वतीने 11 हजार ,नगराध्यक्षा सौ गंगाबाई एकलारे यांच्या वतीने 10 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार असून, या कबड्डी स्पर्धांचा लाभ परिसरातील खेळाडूंनी घ्यावा असे आवाहन मुख्य संयोजक गोविंद सोलव शिवसेना शहरप्रमुख नितीन कदम यांनी केले आहे
