खूजडा येथे वानराचा धुमाकूळ


राजेश वालकर

  • शालेय विद्यार्थ्यांनसह ग्रामस्थ त्रस्त ,वन विभागाचे दुर्लक्ष 
पूर्णा प्रतिनिधी - तालुक्यातील खूजडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना मागील काही दिवसांपासून शाळा परिसरात वानरांनी घातलेल्या धुमाकुळा मुळे शिक्षण घेणे अवघड बनले असून,चक्क शालेय विध्यार्थ्यांनी या वानरांच्या बंदोबस्तासाठी तहसिलदाराकडे धाव घेतली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की,खूजडा येथे पहिली ते सातवी पर्यंत शाळा असून शाळापरिसरात लिंबाचे दोन झाडे आहेत या झाडावर मागील एका वर्षांपासून वानरांनी आपला कब्जा केला असून,सकाळी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना ही वानरे अस्ताव्यस्त आवाज काढून भयभीत करीत आहेत, शाळेच्या परिसरातील पंचवीस ते तीस घरच्या नागरिकांना ही सळो की पळो करून सोडले आहे .घरात घुसून साहित्याची नास धुस करून नित्याचेच बनले आहे काही दिवसांपूर्वी छतावर गेलेल्या महिलेवर हल्ला केल्यामुळे ती जखमी झाली, गावातील एक मुलगा छतावर असतांना त्याच्या मागे वानर लागल्या मुळे तो छतावरून पडून गंभीर जखमी झाला ? या वानराचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी 23 जानेवारी रोजी खूजडा येथील चंद्रकांत मधुकर कुर्हे ,रामप्रसाद कुर्हे,चंद्रकांत अंगद कुर्हे,उद्धव पांचाळ,अच्युत कुर्हे,संदीप कुर्हे,भारत भाकरे,माधव सूर्यवंशी, मारोती सदगर,सह आदींनी तहसिलदार पूर्णा यांच्या कडे केली आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post