तेल्हारा प्रतिनिधि :- बेलखेड येथील गजानन महाराज मंदीर पटांगणात दणदणीत कबड्डी सामन्याचा समारोप झाला यामध्ये प्रथम क्रमांक सेव्हनस्टार संघ उगवा ने जगदंबा संघ हिंगणी चा पराभव करून विजेतेपद पटकाविले.जय हिंद कबड्डी संघ व लोकजागर मंच व्दारा आयोजित बक्षिस वितरणाच्या व्यासपीठावर मधुकरराव खुमकर, डाॅ. सुरेश अढाऊ, श्रीधर टोहरे, डाॅ. सुभाष सदाफळे, नंदकिशोर निमकर्डे , सत्यशील सावरकर, पि. एस. आय हिवरखेड शरद भस्मे, बालमुकंद खुमकर,विक्रांत नागपूरे, श्रीकृष्ण खुमकर, अशोक नराजे, संदीप पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रथम बक्षिस लोकजागर मंचचे संस्थापक अनिल गावंडे यांच्या कडून आलेले 21 हजार चे बक्षीस सेव्हनस्टार उगवा, व्दितीय 11 हजार नंदकिशोर निमकर्डे यांचे जगदंबा हिंगणी , तिसरे 6 हजार चे मोहन गोमासे यांच्या कडून राजे संभाजी राणेगाव तर चौथे 5 हजार चे बक्षिस सतिश जयस्वाल, लखन राजनकर यांच्या कडून राजु-शुभम संघ पातुर्डा ने पटकाविले. यासह उत्कृष्ट संघ , रेडर, पकड यासाठी निलेश उमाळे, किशोर खुमकर, मुजाहिदीन, कुणाल इंगळे यांच्या कडून विजयी संघाना देण्यात आले. यावेळी पंच म्हणून सातव गुरूजी, आशिष सदाफळे, विलास खारोडे, सुधाकर माळी, सुधीर कुकडे ज्ञानेश्वर इंगळे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे संचालन मनिष सदाफळे, शेषराव इंगळे, यांनी तर आभार विकी खुमकर यांनी व्यक्त केले. सामण्याचे यशस्वी आयोजन लोकजागर मंच व जय हिंद चे सुरेश इंगळे, जावेद शहा, बबलू कुकडे, जुनेद शहा , प्रशांत डिगे, निखिल खुमकर, सै.साोहेब , विजय वानखडे, गणेश येनकर, मंगेश सोळंके, पप्पू इंगळे, राहूल शिरेकार, विकी खुमकर, गणेश खुमकर, विलास डिगे, मयुर उमाळे, अजय चौखंडे , फरहान शहा, प्रफुल्ल उबंरकार , रोहित नागपूरे इत्यादी कार्यकर्त्यांनी केले. याप्रसंगी परिसरातील जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.