साडेतीन कोटी च्या शेलू बाजार-एंडली रस्त्याला शासनाची मंजुरात



अतुल नवघरे

  • आमदार हरीश पिंपळे यांचा केला ग्रामस्थांनी सत्कार ; जि.प.सदस्य मायाताई कावरे यांच्या प्रयत्नांना यश

 लाखपुरी,ता.२९ :-  या तालुक्यातील एंडली-शेलू बाजार रस्त्याच्या एक पुल व दोन मो-यांचा समावेश असणाऱ्या साडेतीन कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पास मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून शासनाची मंजुरात मिळवून दिल्याबद्दल आमदार हरीश पिंपळे यांचा एंडली, पिंगळा, शेलू बाजारच्या ग्रामस्थांनी काल झिंगला येथील महारूद्र मारोती संस्थान मध्ये कृउबास संचालक डॉ. अमित कावरे यांच्या हस्ते सत्कार केला . हा रस्ता जीर्ण झाला आहे. मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडले आहेत. वाहनधारक मोठा फेरा पसंद करतात मात्र या रस्त्यावरुन जाणे टाळतात. या रस्त्याच्या कडेचा मुरूमही निघाला आसून तो अधिक जीवघेणा झाला आहे. दळणवळण अक्षरशः बंद असलेल्या या रस्त्याच्या निर्माणासाठी जि.प. सदस्या मायाताई कावरे यांनी प्रचंड पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आमदार पिंपळे यांनी शेलूबाजार ते एंडली ह्या पाच किलो मिटर लांबीच्या तीन गावांमाधील २२१७ लोकसंख्या लाभार्थी ठरणा-या साडेतीन कोटी रूपये खर्चाच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजुरात मिळवून दिली. त्यामुळे त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. रावसाहेब कांबे, भाजप तालुकाध्यक्ष नारायण भटकर, राजु पाटील सदार, निलेश मानके, छत्रपती साबळे,  विनायकराव खंडारे,  एंडलीचे पोलीस पाटील सुनिल वानखडे, बंटी खाडे, सुरेश वानखडे, प्रकाश वानखडे, निशीकांत साखरकर, धांडे, सुनिलअन्ना वानखडे, पिंगळ्याचे सरपंच सुबोध कडू, सुभाष राऊत, नंदू कडू, परसूट भाऊ, अवधूत राऊत गुरुजी, शेलू बाजारचे सरपंच मानकर, अशोक वाघमारे, सोनोने गुरूजी, बंडू राऊत तसेच लाखपुरी, ताकवाडा, गुंजवाडा, शिरताळा, दापुरा, एंडली, सांगवी, दूर्गवाडा, खापरवाडा, टिपटाळा, कोळसरा, सोनोरी, बपोरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post