लाखपुरी येथील रमेश नवघरे यांच्या घरातील कापसाच्या गंजीला आग लागुन ७० हजार रुपयाचे नुकसान..

लाखपुरी येथील ५० ते ७० लोक आले मदतीला धावुन.लोकांनी वेळेवर आग बुजविल्यामुळे आग विजविल्यागेली. अग्निशामक ची गाडी आली आग विजविल्यावर वारे वा शासन.

लाखपुरी:( अतुल नवघरे ) मुर्तिजापुर तालुक्यातील जिल्हापरिषद सर्कल असलेल्या लाखपुरी येथील रमेश आनंदराव नवघरे यांच्या घरातील ६० किव्टंल च्या गंदीला शॉट सर्किटमुळे आग लागल्याने संपुर्ण घराला आग लागली त्यात घरातील सदस्यांना आगीचे धुर दिसताच त्यांनी लोकांना कळविले आजुबाजुतील जवळ पास ५० ते ७० लोक मदतीला धावुन आले . पाणी आगीवर फेकुन आग विजविली व आग आटोक्यात आणली गावातील लोकांना संपुर्ण जळालेला कापुस  विझवुन बाहेर काढला . तसेच गावतील लोकांनी फोन करुन आगनिशामक गाडी पाठविण्यास  सांगितले परंन्तु अग्निशामक दलाची गाडी आग विजविल्यावर आली . नुकसाना मध्ये घराचे नुकसान व कापुस जळाला त्यात जवळ पास ७० हजाराचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी लाखपुरी येथील मंडळ अधिकारी श्री.रामराव जाधव , पटवारी धनंजय मोकळे ,तलाठी चाफे यांनी घटनास्थळी येवुन पंचनामा केला .कापुस व घराचे झालेल्या नुकसानाची शासना कडुन मदतीची अपेक्षा आहे. तरि शासनाने याकडे लक्ष देवुन या कुटूंबाला मदत करांवी अशी मागणी लाखपुरी करांनी केली आहे तलाठी व मंडळ अधिकारी यांना पाठविले आहे.सदर झालेल्या नुकसांनीचा पंचानामा करण्यास पाठविले आहे तरि करुन झालेल्या नुकसानीचा भरपाई देण्यात येईल श्री. राहुल तायडे ( तहसिलदार मुर्तिजापुर )लाखपुरी येथील नवघरे यांच्या घरातील कापसाच्या गंदीला लागलेल्या  आगीत झालेल्या नुकसानाची  शासनाने सदर कुटुबांला मदत करावी. हरिनारायण व्यास ( माजी मुख्याध्यापक लाखपुरी )

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post