खासदार अमरसिंह व झी न्यूज च्या विरोधात अकोल्यात खटला दाखल होण्याची शक्यता

कौन बनेगा राष्ट्रपती  कार्यक्रमात अबू आझमीची केली  बदनामी एड नजीब शेख यांच्या याचिकेवर न्यायालयाने दिले आदेश 

अकोला .  भारतीय प्रसार माध्यमांनी  आपले कार्यक्रम दाखविताना कुणाचीही अब्रू जाणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र याचे पालन झी न्यूज चॅनेल ने केले नाही या चॅनेलवर  गेल्या 15   जुलै 2017 ला  कौन बानेगा राष्ट्रपती हा कार्यक्रम सुरू असतांना  अँकर रोहित सारदाना  यांनी राज्यसभा खासदार अमरसिंह यांना प्रश्न केला की, आप यु पी के राजनीती  को कैसे देखते है. यावर अमरसिंह यांनी उत्तर देतांना  समाजवादी पक्षाचे अबू असीम अजमी यांना लक्ष  करून  देखणा क्या है ,अबू अजमी है ना, अबू आझमी और दाऊद इब्राहिम इनकी गहरी दोस्ती है,जीन के  सरायमिर   यहासे आतंकवाद  फैलाया जाता है और उनके मुंबई के घरसे आतंकवादी खुश होकर  जाते है  असे म्हणून अबू आझमी यांची बेअब्रू केली, याविरोधात अकोला समाजवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष एड नजीब शेख यांनी अकोटफाईल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व झी न्यूज चॅनेलचे अँकर,संपादक, व प्रकाशक आणि राज्यसभा सदस्य तथा  खासदार अमरसिंह यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु पोलीस यांनी गुन्हे दाखल करण्यात टाळाटाळ केली म्हणून एड नजीब शेख यांनी विद्य अकोला न्यायालयात  भा द वि च्या कलम 499,500, 504, 505 व इतर गुन्हा  करण्यासाठी एक जनहित याचिका दाखल केली .या याचिके ची  न्यायालयाने दखल घेत आज दि 15 जानेवारी 2018 रोजी अकोल्यात विद्य प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्याय.दाभाडे यांचे न्यायालयाने  पोलीस यांना याबाबत त्वरित चौकशी अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले . त्यामुळे अकोल्यात खासदार अमरसिंह व ,झी न्यूज चॅनेल च्या अँकर,संपादक यांचे विरोधात खटला  चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे . हे आदेश एड नजीब शेख  यांनी याचिका दाखल केली व न्यायालयाने ती दाखल करून घेऊन  खटला चालविण्यासाठी पोलीस यांना आदेश दिले आहेत  अशी माहिती एड नजीब शेख यांनी दिली आहे



SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post