![]() |
ओसामा शाह
बोरगांव मंजु :- दि.२८/जाने./२०१८ ला भारतीय बौद्ध महासभा अकोला ग्रामशाखा अन्वी मिर्झापुर ता.जि.अकोला च्या वतीने अन्वी मिर्झापुर येथे सूरु असलेल्या १० दिवसीय बौध्दाचार्य श्रामनेर प्रशिक्षण शिबीर , उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीर व समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीर या तीनही शिबीराचा समारोप पुज्य भन्ते बी.संघपाल थेरो ( व्यवस्थापक चैत्यभुमी मुंबई ) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तथा भा.बौद्ध महासभेचे अकोला जिल्हाध्यक्ष आयु.रविन्द्र पां.दारोकार गुरुजी यांच्या हस्ते संपन्न झाला . या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोला पुर्व तालुक्याचे अध्यक्ष आयु.आशिष मेश्राम हे होते. समारोपीय कार्यक्रमाला अकोला जिल्हा भा.बौद्ध महासभेचे महासचिव आयु.भिमरावजी खंडारे,जिल्हा कोषाध्यक्ष आयु.राजाभाऊ लबडे सर, सातारा येथून आलेले केंद्रीय शिक्षक आयु.श्रीमंत घोरपडे गुरुजी ,चंद्रपुर येथून आलेल्या केंद्रीय शिक्षिका आयुष्यमानिनी कैविषताई मेश्राम,जिल्हा महीला आघाडी प्रमुख आयुष्यमानिनी आशाताई अहीरे यांनी विषेश मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला संस्कार विभागाचे प्रमुख आयु.नंदकुमार डोंगरे,पर्यटन विभागाचे प्रमुख आयु.प्रकाश जामनिक,मुंबई वरुन आलेले संरक्षण विभागाचे मेजर आयु.शरणपाल कदम, संरक्षण विभागाचे प्रमुख मानिकराव ईंगळे ,प्रचार प्रसार व पर्यटन विभागाचे जिल्हा सचिव आयु.संदीप गवई ,संस्कार विभाग सचिव आयु.सुधाकर सरदार , आयु.सदाशिव मेश्राम,हीशेब तपासनिस आयु.बि.डी.वानखडे,मुर्तिजापूर ता.अध्यक्ष आयु.दुर्योधन ननिर गुरुजी,अकोला पश्चिम ता.अध्यक्ष आयु.प्रकाश सिरसाठ,बार्शीटाकळी ता.अध्यक्ष आयु.भारत आकोडे, अकोला महानगराचे अध्यक्ष आयु.श्रावणजि ठोसर ,राहुल गोटे,केंद्रीय शिक्षिका नंदाताई ननिर,प्रतिभा सिरसाठ ,मनोरमाताई गवई शोभाताई आठवले,संघटक आयु. सुखदेवराव दामोधर , स रा सरदार ,आयु.दुर्योधन ईंगळे ,आयु .दादाराव जामनिक तशेच अकोला पुर्व चे नागोराव डोंगरे ,अमरदीप सदांशिव ,राहुल तायडे ,सिमाताई वाघ,देवानंद तायडे,श्रीधर डोंगरे,धम्मदीप सुरडकर ,अण्णाभाऊ वाघ,राहुल भगत ,.निलेश वानखडे ,सुधिर मुंद्रे,प्रकाश खंडारे ,संघपाल ईंगळे ,शामराव सिरसाठ ,शालीगराम खडसे,दिपक आडोळे,प्रकाश भगत, राजेंन्द्र वाहुरवाघ,सरोज डोंगरे व आजुबाजुच्या परीसरातील हजारो उपासक उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आम्रपाली उपासिका संघ समता नगर अन्वी,ब्ल्यु टायगर मंडळ समतानगर अन्वी,नवयुवक तरुण मंडळ मिर्झापुर,नागसेन बुध्द विहार समिती अन्वी ,संघमित्रा उपासिका संघ मिर्झापुर,प्रशिक तरुण नवयुवक मंडळ अन्वी,महाविशाखा उपासिका संघ अन्वी,प्रज्ञा तरुण मंडळ अन्वी,प्रकाश आंबेडकर नगर अन्वी,सुकेशनी उपासिका संघ अन्वी व समस्त भारतीय बौद्ध महासभा , भारीप बहुजन महासंघाचे पदाधिकारी गावकरी मंडळी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुञसंचालन आयु.नंदकुमार डोंगरे यांनी व आभार प्रदर्शन तालुकामहासचिव आयु.विष्णुभाऊ श्रुंगारे यांनी केले असे प्रचार प्रसार सचिव आयु.संदीप गवई यांनी कळविले.
