![]() |
पूर्णा - प्रतिनिधी-तालुक्यातील आलेगावं सवराते येथे ग्रामपंचायत मध्ये कार्यालयीन काम करत असताना ग्रामसेवकास एका राजकीय पक्षाच्या जिल्हाउपाध्यक्ष पदावर असलेल्या पदाधिकार्याकडून मारहाण केल्याची घटना घडली असून ,याप्रकरणी चुडावा पोलीस स्थानकात आरोपी विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे ? अधिक माहिती अशी की,चुडावा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या आलेगावं सवराते येथील ग्रामविकास अधिकारी हे 23 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी दोन वाजता शासकीय काम करीत होते, तेव्हा कार्यालयामध्ये येऊन आरोपी गजानन भगवान सवराते यांनी कार्यालयात येऊन बांधकाम परवाना व कागदपत्रे का देत नाहीस या कारणावरून असे म्हणत हुज्जत घातली ,व गालात थापडाने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून दरम्यान मंगळवारी सायंकाळी ग्रामसेवक घिरडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चुडावा पोलीस स्थानकात आरोपी गजानन भगवान सवराते ,राहणार आलेगावं यांच्या विरुद्ध कलम गु.र. 11/18 353,323,504,506,भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नायक नामदेव सुजलोड हे करीत आहेत .
