मुर्तिजापुर ची पूजा लालवानी एम. बी. ए. परिक्षेत विद्यापीठातुन प्रथम


मुर्तिजापुर ( प्रतिनिधि) येथील प्रसिद्ध कापड व्यवसायी सतीश झामनदासजी लालवानी यांची सुकन्या पूजा हीने मास्टर ऑफ़ बीजनेस अड़मिनीस्ट्रेशन (MBA) या पद्वयुत्तर परिक्षेमधे संत गाडगे बाबा अमरावती यूनिवर्सिटी तुन प्रथम क्रमांक पटकविला असून  सुवर्ण पदकाची मानकरी ठरून मुर्तिजापुर च्या नावात आणखी मानाचा तुरा खोचला आहे. कु.पूजा हिचे प्राथमिक शिक्षण श्री व्यंकटेश बालाजी कान्वेंट मुर्तिजापुर येथे तर पुढील शिक्षण विद्याभारती कॉलेज अमरावती आणि प्रो.राम मेघे इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी एंड रिसर्च बडनेरा येथून पूर्ण करीत या सुवर्ण पदकाची मानकारी ठरली आहे . तीला मिळालेल्या या यशा बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध समाजसेवी , समाज बान्धव,साई पालखी समिति, गायत्री परिवार, इत्यादि नी तिचे अभिनन्दन केले आहे. आपल्या या यशाचे श्रेय ती आपल्या परिवारातील सर्व सदस्य,शिक्षक,मित्र तसेच सिरोया परिवार परतवाडा यांना देते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post