सायबर सुरक्षा कार्यशाळा

भंडारा, दि.16 :- भंडारा जिल्हा पोलीस विभाग व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने 17 जानेवारी 2018 रोजी दुपारी 12 वाजता सायबर सुरक्षा या विषयावर मिटींग हॉल पोलीस मुख्यालय, भंडारा या ठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत नागपूर येथील सायबर सुरक्षातज्ञ अभिषेक माहूरे व आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक कमलेश वालदे सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत सायबर सुरक्ष्ोडसंबंधी तसेच सायबर गुन्हयांसंबंधी माहिती देण्यात येणार आहे. या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 



SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post