हँप्पी किड्स स्कुलचे वार्षिक स्नेह संमेलन .


रिजवान सिद्दीकी
मुर्तिजापूर  - प्रतीभावंत नगर येथील ज्ञान नर्मदा बहुउद्देशिय संस्था द्वारा संचालीत हँप्पी किड्स स्कुलचे नरसरी ,के.जी.1व के.जी.2च्या विद्यार्थ्याचे पहीले स्नेहसंमेलन पार पडले .स्नेह संमेलनात चिमुकल्यांचा उत्साह भरभरून वाहत होता .त्यांनी दिलेल्या प्रत्येक प्रस्तुतीवर प्रेक्षक उत्स्फूर्त दाद देत होते .सुरवातीला दीप प्रज्वलन करून पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यीक डॉ.श्नीकांत तीडके तर उद्घाटक म्हणून गटशीक्षण अधीकारी शाम राउत होते.संस्थेचे सचिव विष्णु लोडम यांनी न.प.शिक्षण सभापती सुनिल पवार यांचा सत्कार केला.येथील लहान मुलांच्या कलागुणांचे कौतुक करुन शाळेच्या प्रगती बद्दल डॉ.तीडके यांनी प्रशंसोद्वार काढले.प्रमुख पाहूने प्रियंका जोशी यांनी आपले विचार मांडले.संस्थेच्या अध्यक्षा सुनीता लोडम यांनी शाळा प्रगतीचे अहवाल वाचन केले.तसेच संचालन चंदा अग्रवाल तर आभार मुख्याध्यापिका पल्लवी मुळे यांनी मानले .शाळेने वेळोवेळी आयोजीत केलेल्या स्पर्धेमध्ये उत्क्रष्ट कामगिरी बद्दल पाहूण्यांच्या हस्ते विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात आले त्यानंतर झालेल्या रंगारंग कार्यक्रमात नर्शरी व केजी च्या चिमुकल्यांनी उत्कष्ट अशी प्रस्तुती देत कार्यक्रमाची रंगत भरली .कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक व कर्मचारी पल्लवी मुळे ,अनघा धामोरे,राखी चौबे,भटकर ताई सहीत अनेकांनी प्रयत्न केलेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post