एसटी आगारातून पळवून नेलेला वाऴूचा टिपर .

शोधण्यात पोलीसांना अद्यापही अपयश ... 

 शिवाजीराव ( मंगळवेढा )
मंगळवेढा तहसिलदार यांनी बेकायदा वाळूचा टिपर पकडून एसटी आगारात लावला होता. दरम्यान, हा टिपर चालकाने पळवून नेल्याचा गुन्हा पोलीसात दाखल होवून बारा दिवसाचा कालावधी लोटला. अद्यापही पोलीसांना टिपरचा चालक व टिपर न सापडल्यामुळे तपास प्रक्रियेवर साशंकता व्यक्त होत असून हा टिपर एका पोलीसाचा असल्याची चर्चा सुरू आहे. पाेलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी लक्ष घालून वाळू व्यवसाय करनार्या पाेलीसावर कारवाईकरावी आशि मागणी हाेत आहे.दि.11 रोजी सकाळी 9 वा.मंगळवेढा शहराजवळ तहसिलदार गणेश लव्हे यांनी भीमा नदी पात्रातून बेकायदा वाळू घेवून आलेला एम.एच-13.ए.एक्स-4990 हा टिपर पकडून सुरक्षतेच्या कारणास्तव मंगळवेढा एसटी आगारात लावला होता. दि.12 च्या पहाटे 2 वा.सदर टिपर चालकाने एसटी आगारातून तो टिपर पळवून नेला. याप्रकरणी टिपर चालकाविरूध्द टिपर पळविल्याचा गुन्हाही दाखल झाला आहे. मात्र चालक व टिपरचा तपास पोलीसांना अद्यापही लागला नाही. हा टिपर एका पोलीस कर्मचार्‍याचा असल्याची माहिती चर्चली जात असून गेली वर्षभर बेकायदा वाळूउपशाचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत कुठल्याही पोलीस पथकाने त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे तो बिनधास्तपणे वाळूचा व्यवसाय करीत होता. मात्र दि.12 रोजीचा दिवस या टिपरला काळरात्र आला अन तो अलगद तहसिलदारांच्या जाळ्यात सापडल्याने या घटनेमागचे बिंग बाहेर पडले. त्या पोलीसाने तो टिपर चक्क चालकाच्या नावे करून वाळूतस्करी सुरू केल्याची माहिती उजेडात आली आहे. यापूर्वी तो वसुलीला होता. त्यामुळे वाळूला सोने म्हटले जाते त्याचा मोह त्याला न आवरल्यामुळे टिपरच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केल्याची चर्चा सुरू आहे. एफ.आर.मधला टिपरचा नंबर हा बनावट असल्याचीही माहिती नागरिक दबक्या आवाजात बोलत आहेत. दरम्यान, ए.एक्स-4989 या क्रमांकाच्या टिपरचा मालक नेमका कोण आहे? हे आपल्या विभागाकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रावरून प्रस्तुत वाहनाची चौकशी करून वाहन कोणाच्या नावावर आहे. याचा अभिप्राय दोन दिवसात मंगळवेढा तहसिल कार्यालयास कळावावा असे पत्र तहसिलदार यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांना दिली आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post