![]() |
- तालुका प्रमुख शहरप्रमुखासह अनेक निष्ठावंत शिवसैनिक मनसेत दाखल - कृष्णकुंज मध्ये घेतला प्रवेश
पांढरकवडा प्रतिनिधी - नगर परिषद निवडणुकीवरून मतभेत निर्माण होऊन दुखावलेले शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते स्वाभिमान जपण्यासाठी अखेर पक्षत्याग करून राज ठाकरे यांचे प्रमुख उपस्थितीत मुंबईत कृष्णकुंज मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे केळापुर तालुक्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत जुन्या निष्ठावंतांपैकी एकालाही शिवसेनेने तिकीट दिले नाही. तर येथे शिवसेनेची धुरा सांभाळणारे महसुल राज्यमंत्री ना. संजय राठोड यांनी शिवसेना पारवेकर गटाच्या दावणीला बांधली व सर्व सुत्रे संतोष बोरेले यांचेकडे सोपविली. त्यामुळे दुखावलेले निष्ठावंत शिवसैनिक व पदाधिकारी हे स्वपक्षातच घुटमळत होते. शिवसेने पासुन फारकत घेत मनसे स्थापन करणाया ठाकरे घराण्यातील ज्वलंत नेतृत्व राज ठाकरे यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत शिवसेनेचे तालुका प्रमुख तिरूपती कंदकुरीवार, शहर प्रमुख किशोर कनाके, नटवर शर्मा, चंद्रकांत बोरेले यांचेसह अनेक प्रमुख शिवसैनीक यांनी मुंबई स्थित ठाकरे निवासस्थानी कृष्णकुंज मध्ये मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजु उंबरकर व संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे प्रमुख उपस्थितीत मनसेत प्रवेश घेतला. यावेळी नाना मानेवार, जयंत कनाके, शाहरुख खान, क्रीष्णा गजबे, रूपेश दारूंडे, जितु सिंघानीया, प्रशांत सोयाम, संतोष थोरात, विनोद ताडपेल्लीवार, सचिन खांडरे, विनोद नटपेल्लीवार, श्रीराम दरणे, संतोष पुरके, संतोष हामंद, प्रभाकर येरमे, प्यारे जगताप, किशोर आडे, सागर मुडे, शिवा मिश्राम, श्रीराम वाघाडे सुरज बंडीवार, अशोक आत्राम, विनोद कासार, नागेश्वर मेश्राम, हरीओम नागभिडकर, यांनीही कृष्णकुंजमधेच मनसेत रितसर प्रवेश घेतला. त्यामुळे केळापूर तालुक्यात मरगळलेल्या मनसेला मोठी ताकद प्राप्त झाली आहे. ज्यांनी प्रवेश घेतला ते हाडाचे सामाजिक कार्यकर्ते असून नेहमीच जनकार्यासाठी तत्पर असतात. त्यांनी अनेकांना न्याय देखील मिळवून दिला असून रूग्णांची सेवाही ते मनापासून करतात त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग केळापूर तालुक्यात आहे तिरूपती कंदकुरीवार, नटवर शर्मा, किशोर कनाके व त्यांच्या सहकारीमुळे मनसे केळापुर तालुक्यात बळकट झाली आहे तर शिवसेनेला मात्र मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच घेतलेल्या जागो हिंदुस्थानी कार्यक्रमातून शिवसेनेने तालुक्यात आपली ताकद तपासली आहे.
