नगराध्यक्ष चषक हाफ मँरेथॉन स्पर्धेचे आयोजन


मूर्तीजापुर  ( प्रतिनिधी )  येथील मैत्री बहुउदेशीय संस्थेच्या वतीने रविवार दि.४फ्रेब्रुवारी2018 रोजी (खुल्या पुरुष गट अंतर 5 किमी) नगराध्यक्ष चषक हाफ मँरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व जिल्ह्यबाहेरील जास्तीत जास्त स्पर्धेकांनी यामध्ये भाग घ्यावा म्हणून संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी याकरिता जयत तयारी सुरू केली आहे. प्रथमच भव्य प्रमाणात होणाऱ्या या स्पर्धे विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 21000/- रूपये नगराध्यक्षा सौ. मोनाली कमलाकर गावंडे यांचे वतीने, दितीय पारीतोषीक 15000/- रुपये निजामभाई इंजिनिअर यांचे वतीने तर तिसरे पारितोषिक 10000/- रूपये नगरसेवक सचिन देशमुख व राहुल पाटील यांचे वतीने  देण्यात येणार आहे. स्पर्धा सकाळी 9 वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक मूर्तीजापुर ते भटोरी नाका दर्योपुर रोड पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. युवकामध्ये तसेच तरूण पिढीत मैदानी खेळासह इतर स्पर्धा विषयी आकर्षक वाढावे व आरोग्य संपन्न सुसंवाद व्हावे तसेच एकतेची भावना वाढीस लागावी म्हणून सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धे करीता खासदार संजय धोत्रे, आमदार हरिष पिंपळे, आमदार रणधीर सावरकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष तेजराव थोरात, अँड.गिरीश गोखले, नगराध्यक्षा सौ. मोनाली कमलाकर गावंडे यांचे सह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर स्पर्धेचा समारोप भटोरी नाका, दर्यापूर रोड मूर्तीजापुर येथे बक्षीस वितरणाने करण्यात येणार आहे. तरी सर्व स्पर्धेकांनी आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राहुल वानखडे यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post