मोतीबिंदूने पिडित 70 नेत्र रूग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया .


    विलास नसले             
                  भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया  शिबिरात शेकडो रूग्णांची तपासणी
मुर्तिजापूर - येथील शहर आणि तालुका काॅंग्रेस सेवादल मुर्तिजापूरचे वतीने  दृृष्टीधारण  व अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत रोटरी क्लब आॅफ बाॅम्बे हॅंगींग व दम्माणी नेत्र हाॅस्पीटल अकोलाच्या मदतीने भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व चश्मा वितरण कार्यक्रमाचे आयोजन समता नगरातील राधे राधे सत्संग भवन येथे करण्यात आले होते.मुर्तिजापूर येथील शहर व तालुका काॅंग्रेस सेवादल व दम्माणी आय हाॅस्पीटल यांचेवतीने आयोजित नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चश्मा वाटप शिबीर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  नगराध्यक्षा सौ. मोनाली कमलाकर गावंडे तर उदघाटक म्हणून माजी महापैर व अकोला प्रदेश काॅंग्रेस कमेटीचे सचिव मदन भरगड यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक द्वाराकाप्रसाद दुबे, अकोला जिल्हा सहनियंत्रण समिती अध्यक्ष अविनाश देशमुख, दम्माणी नेत्र रूग्णालयाचे व्यवस्थापक सभापती शुक्ल अकोला जिल्हा दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रशांत हजारी, समजासेवक कैलाश महाजन, कमलाकर गावंडे, पंचायत समितीचे उपसभापती उमेश मडगे, शहर काॅंग्रेस कमेटी अध्यक्ष धीरज अग्रवाल, तालुकाध्यक्ष गणेश महल्ले, नगरसेवक सुनिल पवार, आशिष बरे, अनिता हजारी, जयंतीभाई हरीया, अवघाते, प्राचार्य सत्यनारायण तिवारी  आदींची उपस्थिती होती. दम्माणी आय हाॅस्पीटलच्या तज्ज्ञ डाॅक्अरांनी 450 रूग्णांची नेत्र तपासणी केली. त्यापैकी 70  मोतीबिंदने पिडित नेत्र रूग्णांवर  शस्त्रक्रिया  करण्यात येणार आहे. सदर रूग्णांवर फेब्रुवारी व मार्च महिन्यात मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे दम्माणी नेत्र रूग्णालयाचे व्यवस्थापक सभापती षुक्ल यांनी सांगितले. षिबिराचे आयोजन प्रशिक्षक प्रदेश काॅंग्रेस सेवादल जिल्हा मुख्य संघटक अषोक मदनलाल दुबे यांनी केले होते. या शिबिरामध्ये स्वच्छता अभियानांतर्गत शहरात स्वच्छता अभियान राबविणारे माजी प्राचार्य सत्यानारायण तिवारी व स्वच्छता अभियान मुर्तिजापूरचे सक्रीय स्वच्छतादुत  यांचा प्रमाणपत्र देउन मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
शिबीर यशस्वतेसाठी नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे, कैलास महाजन, धीरज अग्रवाल,सेवादल मुख्य संघटक सुनिल वानखडे, जिल्हा संघटक रोहित सोळंके, रा.नै. पातालबंसी, राजु जोगदंड, रहेमान शाह ,विलास वानखडे, नागोराव तायडे, रमेष पालिवाल, ज्ञानदेव भड, अमोल तातुरकर, दिनेश श्रीवास, नुरूभाई इरफान खाॅं डालेवाले, इम्रान खान, सोहेल खान, दुर्गाबाई मोहिते आदि सेवादल कार्यकर्ता पदाधिकारी यांनी सहकार्य केले.संचालन व आभार अशोक दुबे यांनी केले. 

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post