Showing posts with label लाइफ स्टाइल. Show all posts
Showing posts with label लाइफ स्टाइल. Show all posts
#डॉक्टर हो_आम्ही_सुद्धा.!

#डॉक्टर हो_आम्ही_सुद्धा.!



  •  डॉक्टरांची प्रतिकूल बाजू


केवळ 90% पेक्षा जास्त मार्कस् मिळाले म्हणून, किंवा आपले पालक अथवा नातेवाईक म्हणतात म्हणून, किंवा तुम्हाला जास्त पैसे कमवायचे आहेत म्हणून वैद्यकीय क्षेत्र अजिबात निवडू नका. जे खरचं कठीण परिश्रम करू शकतात, मानसिक ताण-तणाव सहन करू शकतात आणि ज्यांना मनापासून रूग्णांना बरे करण्याप्रती उत्कटता आहे आणि जे या क्षेत्रात आल्यानंतर आपल्या आवडी निवडींचा त्याग करण्यास तयार असतील, जे कोणत्याही कठीण परिस्थितीत टिकून राहू शकतील त्यांनी खरचं वैद्यकीय क्षेत्रात यावे.

कारण वैद्यकीय क्षेत्रात आल्यानंतर तुमचे खाजगी असे जिवन जास्त रहातच नाही. तुमचा बहुतांश वेळ हा रूग्णालयात आणि रूग्णांच्या सान्निध्यातच जातो.

नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, अश्याच दोन बाजू प्रत्येक क्षेत्राच्या देखील असतात असं मी मानते. सगळ्यांसाठी वैद्य हा देवमाणूस समानच असतो, पण वैद्यांना सुध्दा बर्याच वाईट गोष्टींचाही सामना करावा लागतो.

आता हेच पहा ना, भारतामध्येच कितीतरी वैद्यांना मारहाण करण्यात आली आणि अजुनही मारहाण करण्यात येते. आणि या गोष्टी कोणीही वैद्य मानसिकरित्या मुळीच विसरू शकत नाही. सामान्य जणतेने खरंच वैद्यांकडून विश्वास गमावला आहे. निदान आत्तापर्यंत तरी जनतेकडून अशीच वर्तनुक होती. परंतु आता या Covid-19 मुळे काही अंशी ही परिस्थिती हळूहळू बदलत आहे, मी ते ही मान्य करते.

असो..

मी एक प्रश्न स्पष्टपणे विचारते, स्वतःला ही आणि तुम्हाला ही, आजकाल खरचं अशे किती रूग्ण आहे जे वैद्याने सांगितलेले पथ्य इत्यादी गोष्टी अगदी विश्वासाने ऐकतात आणि त्याचे पालन करतात ?

अर्थातच दहा पैकी पाच रूग्ण हे वैद्याने सांगितले खरंच मनापासून ऐकत नाहीच. ५० ते ७० वयाच्या सुमारासचे केवळ जे वरिष्ठ नागरिक रूग्ण असतात खरंतर फक्त तेच वैद्यांच बोलणे अगदी सिरीयसली ऐकतात आणि त्याचे पालन करतात.

एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, कोणत्याही तरुण रूग्णापेक्षा जे वरिष्ठ नागरिक रूग्ण असतात ते रूग्णच वैद्याचे मनोभावे आभार मानतात. कारण तरुण रूग्ण फक्त वैद्यांना शुल्क देण्यासाठी आणि त्यांच्याकडून सेवा पुरवुन घेणारे मानतात. म्हणजेच मी तुला पैसे देतोय, त्यामुळे तुम्ही तुमचे काम करा.! असा काहीसा आविर्भाव तरूण रुग्ण वर्गाचा असतो.

अशाच आणि इतरही बर्याच काही कारणांमुळे आजच्या तरुण वैद्यकीय पिढीमध्ये ताण, तणाव, उदासीनता, निराशा आणि एकाकीपणाचे प्रमाण वाढले आहे. वैद्य हा त्याचे मित्र, कुटुंब आणि सहकार्यांसह सभोवताली तर असतोच, परंतु तरीसुद्धा प्रत्यक्षात तो एकटाच असतो.

..आणि जर वैद्याच्या कुटुंबात अथवा मित्र परिवार मध्ये जर वैद्यकीय क्षेत्राशी निगडित कोणी नसल्यास, वैद्य सफर करत असलेल्या कठीण परिस्थितींना कोणी योग्य पद्धतीने नाहीच समजून घेऊ शकत. अशावेळेस तुम्ही वैद्यांना सहानुभूती नक्कीच देऊ शकाल, पण तुम्ही आमच्या वैद्यकीय क्षेत्राची वास्तविकता समजण्यास असमर्थच व्हाल.

आम्हाला आधी शिक्षणामुळे तुमच्या सगळ्यांपासून दूर रहावे लागते आणि नंतर काम सुरू झाले की दिवस रात्र रूग्णालय आणि रूग्ण यांच्यासमवेतच दिवस जातात. यामुळे आम्हाला तुम्हा सगळ्यांशी भेटणं तर लांबच पण कॉल अथवा मेसेज वर देखील बोलायला एवढा वेळ मिळत नाही. ईतके आम्ही रूग्णालयामध्ये रूग्णांचे व्यवस्थापन करण्यात व्यस्त होऊन जातो.

खरंच इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा वैद्यकीय क्षेत्र हे सर्वात व्यस्त क्षेत्र आहे. कारण या क्षेत्रात दिवस रात्र २४ तास सेवा करत रहावी लागते. अशा परिस्थिती मग बर्याच जणांचा असाच समज असतो की वैद्य किती अहंकारी आणि गर्विष्ठ असतात, का तर आम्ही तुम्हाला भेटंत बोलंत नाही, वेळ देत नाही म्हणून..

बाकीच्या या सर्व गोष्टींमुळे आम्ही आधीच निराश झालेलो असतो आणि अशा वेळेस वैद्यांनाच जर कोणी समजून घेणार नसेल तर अथार्तच वैद्य उदासीन, निराश होऊन एकाकीपणाकडे वळतात. शेवटी वैद्य सुध्दा माणूसच आहे. त्यालाही मन असतं. कारण एकाच शाखेत काम करणारे सहकारी एकमेकांकडे स्पर्धक म्हणूनच पाहतात. इतके की ते तुम्हाला अपयशी झालेले पाहण्यासाठी आतुर असतात. खरंतर अशा वेळेस वैद्यांना तुम्हीच स्वत:हुन समजून घेऊन, तुमच्या साथ ची खरी गरज असते. या सर्व अलौकिक अपेक्षा सह, वैद्य त्याच्या मानसिक आरोग्य सह अनेक संघर्ष करत राहतो.

म्हणूनच सर्व वैद्यांना मी हेच सांगु इच्छिते की, मान्य आहे ही सर्व परिस्थिती प्रत्येक वैद्यासाठी कमी जास्त प्रमाणात असेल, पण हे तेवढेच खरे आहे की आपल्याला या वास्तव्यासह जगून, लढत राहून, यातून चांगलेच शिकत राहीले पाहीजे आणि अशा परिस्थितींशी लढण्यास स्वतःला कणखर केले पाहिजे.

म्हणून जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्र निवडायचे असेल तर तुम्हाला फक्त शरीरानेच नाही तर मनाने देखील मजबूत राहणं अपेक्षित आहे.

डॉ. अक्षया विजय पवार.
(वैद्यकीय अधिकारी, सोलापूर महानगर पालिका)
कोविड -१९ साठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना

कोविड -१९ साठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना


 राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत सर्वसामान्यांसाठी कोविड -१९ साठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर, टास्क फोर्स ऑन आयुष्य फॉर कोविड-१९ गठीत करण्यात आला होता. त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना  प्रतिबंधात्मक उपाय तसेच अलक्षणिक  रुग्णांवरील उपचारासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.


  • सामान्य प्रतिबंधात्मक उपाय:

१. वैयत्तिक स्वच्छतेचे पालन करणे.
२. वारंवार साबणाने हात २० सेकंदापर्यंत धुणे
३. खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा
४. ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा ज्यांना सर्दी खोकला इत्यादी आजाराची लक्षणे आहेत, अशा व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळावा.
५. जिवंत प्राण्यांशी संपर्क व कच्चे न शिजवलेले मांस खाणे टाळा.
६. पशुपालन गृह तसेच जिवंत पशु विक्री केंद्र किंवा कत्तलखाने या ठिकाणी प्रवास टाळावा

आयुष उपाययोजना पुढीलप्रमाणे
१. ताजे, उष्ण व पचायला हलके भोजन घ्यावे. भोजनात अख्खी आणि ऋतूनुसार भाज्यांचा समावेश असावा
२. तुळशीची पाने, ठेचलेले आले व हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे.
३. सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर काळी मिरी, चूर्ण मधातून सेवन करणे फायदेशीर आहे.
४. कोविड-१९ लक्षणांमध्ये तुळस, गुळवेल, आले आणि हळद या सामान्य औषधी वनस्पती उपयुक्त आहेत.
५. थंड, फ्रिज मध्ये ठेवलेले व पचायला जाड असलेले पदार्थ टाळावे.
६. थंड वाऱ्याचा थेट संपर्क टाळावा.
७. विश्रांती व वेळेत झोप हितकारक आहे.
८. प्रशिक्षित योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायाम करावे.
९. मुगाचे कढण / सूप / पाणी – मुगडाळ पाण्यात उकळून तयार केलेले मुगाचे गरम कढण / सूप / पाणी प्यावे, ते पोषक आहे.
१०. सुवर्ण दुग्ध / दुग्ध – १५० मिलीमीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण मिसळून हे दूध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी व रोग प्रतिबंधासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार
आयुर्वेदिक औषधी
१. संशमनी वटी १ गोळी दिवसातून दोनदा असे १५ दिवस
२. तुळस चार भाग, सुंठ दोन भाग, दालचिनी दोन भाग व काळी मिरी एक भाग या द्रव्याच्या भरड चूर्ण तयार करणे. वरील औषधीचे तीन ग्रॅम भरड चूर्ण १०० मिलिलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून ५-७ मिनिटे ठेवणे व नंतर हे पाणी पिणे.
३. च्यवनप्राश १० ग्रॅम सकाळी सेवन करणे (मधुमेही रुग्णांनी साखरविरहित च्यवनप्राश सेवन करावे. 
४. सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल / खोबरेलतेल किंवा हे बोटाने लावावे.
५. तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळतेल/ खोबरेलतेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.

युनानी औषधी
१. बिहिदाना ५ ग्रॅम, बर्गे गावजबान ७ ग्रॅम, उन्नाब ७ दाने, , सपिस्तान ७ दाने, दालचिनी ३ ग्रॅम, बनपाशा ५ ग्रॅम यांचा काढा करून २५० मिलिलिटर पाण्यामध्ये १५ मिनिटे उकळावे व गरम असताना चहाप्रमाणे दिवसातून १ किंवा २ वेळा १५ दिवसांकरिता घ्यावे.
२. खमीरा मरवारीद दुधासोबत ५ ग्रॅम दिवसातून दोनदा घ्यावे. मधुमेही रुग्णांनी घेऊ नये.

होमिओपॅथी औषधी
१. आर्सेनिकम अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्यावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा.

कोविड-१९ सारखी लक्षणे असणाऱ्या इतर आजारासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार

आयुर्वेदिक औषधी
१. टॅबलेट आयुष्य ६४ – (५०० मिलिग्रॅम)  दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे     
२. अगस्त्य हरितकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.
३. अणुतेल – तीळतेल – दोन थेंब प्रतिदिन सकाळी नाकपुडीत टाकणे.
४. ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा पाण्यात उकळून त्याची वाफ दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्यावी.
५. खोकला व घास खवखवत असल्यास साखर अथवा मध यामध्ये लवंग चूर्ण मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.

युनानी औषधी
१. अर्धा ग्लास पाण्यामध्ये आरके अजिब ५ थेंब मिसळून गुळण्या कराव्यात, असे १५ दिवस करावे.
२. तिर्यक अर्बा – हब्बूल घर, ज्यूतिआना, मूर झरवंद तविल या सर्व घटकांचे चूर्ण तयार करून तुपामध्ये परतावे व मध गरम करून त्यामध्ये ही औषधे मिसळावीत. याचा वापर चूर्ण स्वरूपातही करता येतो, हे औषध १५ दिवस घ्यावे.

होमिओपॅथिक औषधी
१. आर्सेनिकम अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्यावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा. 

२.तसेच ब्रायोनिया अल्वा, हस टॉक्सिको डेन्ड्रॉन, बेलॉडोना जेलसेमियम, युप्याटोरियम, परफॉलीएटम ही औषधे देखील सर्दी खोकला, फ्लू समान रोगांमध्ये चिकित्सेसाठी उपयुक्त्त ठरली आहेत.

(उपरोक्त सर्व औषधे तज्ञ  आयुर्वेदिक , युनानी आणि होमिओपॅथी  डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावीत )

कोविड-१९ पॉझिटिव्ह, अलक्षणिक, चिकित्सालयीन तपासणीनुसार स्थिर असणाऱ्या व इतर वर्तमान गंभीर व्याधीरहित रुग्णांकरिता प्रस्थापित चिकित्सेला पूरक आयुर्वेद व होमिओपॅथी उपचार

आयुर्वेदिक औषधी
१. टॅबलेट आयुष्य ६४ – (५०० मिलिग्रॅम)  दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे किंवा टॅबलेट सुदर्शन घनवटी – २५० मिलिग्रॅम दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे.
२. अगस्त्य हरितकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.
३. अणुतेल – तीळतेल – दोन थेंब प्रतिदिन सकाळी व संध्याकाळी नाकपुडीत टाकणे. 
४. तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळतेल/ खोबरेलतेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.
५. गरम पाण्याची वाफ दोनदा किंवा तीनदा घ्यावी.

होमिओपॅथिक औषधी
१.कोविड -१९ समान रोगांच्या लक्षणांच्या चिकीत्सेकरिता नमूद औषधांचा वापर हा प्रस्थापित चिकीत्सेस पूरक चिकित्सा म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व औषधे तज्ञ आयुर्वेदिक व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावे.

कोविड -१९ या संसर्गजन्य आजाराची लक्षणे जाणविल्यास तात्काळ चाचणी करून घेणे व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक राहील.
पूर्वज माकड होते हे ६८.५% भारतीयांना मान्य

पूर्वज माकड होते हे ६८.५% भारतीयांना मान्य


चार्ल्स डार्विन याच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताविषयी जगभरात आजही मतभेद आहेत. भारतही त्यास अपवाद नाही. माणूस हा माकडापासून उत्क्रांत झाल्याची मांडणी डार्विन यानं केली होती. त्याच्या या मांडणीला त्या काळी कडाडून विरोध झाला होता. वैज्ञानिक प्रगतीबरोबर हा विरोध मावळला असला तरी उत्क्रांतीचा सिद्धांत अजूनही पूर्णपणे स्वीकारला गेलेला नाही. भारतात त्याच्या सिद्धांताची अनेकदा जाहीर खिल्ली उडवली जाते. असं असलं तरी भारतात आजही त्याचं पारडं जड असल्याचं नव्या पाहणीतून समोर आलंय. काय आहे या पाहणी अहवालाचा निष्कर्ष? पाहूया पुढील इन्फोग्राफच्या माध्यमातून...
सातारा जिल्ह्यात रास्ता रोको, जाळपोळीप्रकरणी २४ जणांवर गुन्हा

सातारा जिल्ह्यात रास्ता रोको, जाळपोळीप्रकरणी २४ जणांवर गुन्हा



सातारा : ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर रस्ता अडवून जाळपोळ व घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर, वाठार व औंध पोलीस ठाण्यात २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनेमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांतिदिनी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश जारी केला होता. तरी गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पिंपोडे बुद्रुक ते सोळशी रस्त्यावर नांदवळ एसटी बस स्थानकासमोर काही युवक बेकायदा जमा झाले. त्यातील विश्वजित विनोद पवार, अफसर हबीब शेख, ओंकार रवींद्र पवार, संग्राम दिलीप पवार, भूषण अरुण पवार, सौरभ प्रमोद पवार (सर्वजण रा. नांदवळ, ता. कोरेगाव) यांनी रस्ता अडवून टायर पेटवून दिले. याबाबत वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुसेगाव-कराड रस्त्यावर राजाचे कुर्ले येथे वैभव संभाजी माने, तानाजी संभाजी माने, राहुल बाळकृष्ण यादव, संभाजी शंकर कदम व इतर तीन ते चार जणांनी (सर्वजण रा. राजाचे कुर्ले, ता. खटाव) रस्ता अडवून दुचाकीचे टायर जाळले. याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बॉम्बे रेस्टॉरंट ते पोवई नाका रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता दारूच्या बाटल्या बाळगून आरडाओरडा केल्याप्रकरणी हृषिकेश चंद्रकांत लाड (रा. शाहू चौक), गणेश साळवी, अभिजित ऊर्फ भैया अभिजित साबळे व इतर चार ते पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.