मुतिजापूर ग्रामीण पत्रकार संघाच्या शहराध्यक्ष पदी अथर खान


मुतिजापूर :- मुतिजापूर येथे आयोजित स्व पी एल सिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाची बैठक सोमवारी दुपारी बारा वाजता विश्रामगृह क्र एक वर आयोजित करण्यात आली असता बैठकीचे अध्यक्षपदी ग्रामीण पत्रकार संघाचे राजाध्यक्ष पी एन बोळे सर होते तर प्रमुख उपस्थित जिल्हा अध्यक्ष विलासभाऊ नसले  विलास मुलमुले सर, प्रा दिपक जोशी सर, तालुका अध्यक्ष प्रा एल डी सरोदे यांच्या उपस्थितीत अथर खान यांची ग्रामीण पत्रकार संघाच्या शहराध्यक्ष पदी अविरोध निवड करण्यात आली असता जिल्हा अध्यक्ष विलासभाऊ नसले यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व प्रमुख उपस्थितीत पत्रकारांनी अथर खान यांचे स्वागत केले.


 व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून विलास मुलमुले सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकारांच्या अनेक संघटना आहेत परंतू संघटना असून चालत नाही तर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहीजे, असे मत व्यक्त केले, प्रा दिपक जोशी सर म्हणाले की मी ग्रामीण पत्रकार संघाच्या कामगिरीवर खुश आहे कारण ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी नेहमी सवौंना सहकार्य करताना दिसत आहेत ,ग्रामीण पत्रकार संघाची कामगिरी चांगली आहे, एकमेकांना समजून घेण्याची त्यांची तयारी आहे, संजय उमक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे जाण्याची गरज आहे शेवटी अध्यक्षीय भाषणात पी एन बोळे सर यांनी आपले मत व्यक्त करताना पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात आपल्याला सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.

 कारण शासनाने वेळोवेळी अनेक निणैय बदलले आहे शासन वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी   विलासभाऊ नसले, प्रा एल डी सरोदे, अतुल नवघरे, प्रविण ढगे, अथर खान, संजय उमक,संतोषभाऊ माने बबलूभैया यादव, अजय प्रभे शेख रिजवानभाई, आकाश जामनिक, महेंद्र बोळे, अनिल भेडंकर, उद्धव कोकणे, बाळासाहेब गणोरकर, शरीक कुरैश, रूपेश कडू पंकज सातपुते, शफीखान पठाण, पंकज बाजड, रोहीत सोळंके, बोरकर, शाम काकडे, पटवधैन खंडारे, गौरव अग्रवाल यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी अथर खान यांना पुढील कायौसाठी शुभेच्छा दिल्या

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post