लोहारा/प्रतिनिॆधी :- लोहारा शहरात व तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन दि.6 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला.
महापरिनिर्वाण दिनानिनयमित्त शहरातील शिवाजी चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन युवा सेना तालुका प्रमुख दीपक मुळे व नगरसेवक श्रीनिवास माळी यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामुहिक धम्मवंदना घेण्यात आली.यावेळी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, नगरसेविका जयश्री कांबळे,नगरसेवक आरीफ खानापुरे, रिपाइ (आ) तालुका अध्यक्ष दिगंबर कांबळे, रिपाइ (आ) माजी तालुका अध्यक्ष श्रीकांत कांबळे, पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, भाजप मिडिया तालुका अध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला, ओबीसी भाजप तालुका अध्यक्ष दगडु तिगाडे, मोहन गोरे, जनक कुलकर्णी,
मल्लिनाथ फावडे, दीपक सोनकांबळे,मारुती रोडगे, बाळू शिंदे, मिलिंद नागवंशी, युवक कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, जयश्री लोहार, सुनिता कांबळे, अनुसया शिंदे,अनिता कांबळे, रत्नाबाई गायकवाड, नंदा कांबळे, सुरेखा कांबळे, कावेराबाई कांबळे, अमोल माटे, तात्याराव कांबळे, विक्रम मोरे, धम्मपाल कांबळे, दत्ता कांबळे, आदम शेख, चंद्रकांत गायकवाड, यांच्यासह शहरातील महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोहारा नगर पंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा
महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगर पंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन नगराध्यक्षा सौ.ज्योतीताई दिपक मुळे व उप नगराध्यक्ष प्रताप घोडके यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा ज्योतीताई मुळे, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, नगरसेविका निर्मला स्वामी,
नगरसेविका जयश्री कांबळे, नगरसेवक बाळासाहेब कोरे, नगरसेवक आरीफ खानापुरे, नगरसेवक श्रीनिवास माळी, नगरसेवक अभिमान खराडे, नगरसेवक गगन माळवदकर, दिपक मुळे, शिवा स्वामी, विजय ढगे, हरी लोखंडे, कार्यालयीन अधिक्षक पी.पी.पोते, स्वच्छता विभाग प्रमुख अफजल शेख, अमिन सुंबेकर, भागवत वाघमारे, नवनाथ लोहार, पप्पु मुळे,वैभव पाटील, गुलशन बागवान, संदीप सातपुते, श्रीशैल मिटकरी, अमोल बिराजदार, सुवन डोकडे,गणेश काडगावे, उमाकांत सगट, यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
