लोहारा/प्रतिनिधी :- गुजरात राज्याप्रमाणे महाराष्टातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात या मागणीसाठी महाराष्ट राज्य कोतवाल लोहारा तालुका संघटनेच्यावतीने दि.24 डिसेंब रोजी काम बंद आंदोलन करुन याबाबत तहसीलदार राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट राज्यातील महसुल सेवेतील कोतवालांना प्रतिमहिना 500 रु भत्ता व 10 रु चप्पल शिलाई भत्ता दिला जातो.
एका कोतवालाची प्रत्येक सज्जास नेमणुक केली जाते. प्रत्येक सज्जामध्ये तिन ते चार गावे आहेत.या गावात शासकीय कामासाठी जावे लागते. व आमच्याकडुन वरिष्ठ कार्यालयात बोलावुन चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याप्रमाणे सर्व कामे करुन घेतली जातात. यासाठी आम्हाला प्रवास भत्ता, दैनिक भत्ता दिला जात नाही. त्यामुळे आम्हची आर्थिक पिळवणुक होत आहे. कोतवाल हा निवडणुक कामासाठी पुर्ण वेळ कार्यरत असतो. शासकीय टपाल वाटप, शासकीय वसुली, गौण खनिज, अवैध वाहतुक रोखणे, अदि कामासाठी कोतवालांना आदेशीत केले जाते.
परंतु कोतवालांना दिले जाणारे मानधन हे तुटपुंजे आहे. तरी कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा,अशी मागणी निवेदनात केली आहे.
लोहारा तालुक्यातील कोतवाल संघटनेनी दि.24 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. यानंतर दि.31 डिसेंबर रोजी राज्यातील कोतवाल संघटनेच्यावतीने मुंबई येथील आझाद मैदानावर विद्रोही व अन्न त्याग सत्याग्रह करण्यात येणार आहे.
या निवेदनावर तालुका अध्यक्ष एस.टी.गिरी, तालुका सचिव एस.डी.क्षीरसागर, तालुका उपाध्यक्ष श्रीमती पी.बी.माटे, श्रीमती पी.टी.
वाकळे, एन.के.गायकवाड, जी.ए.खळे, एस.टी.जाधव, ए.एल.राठोड, एम.एस.कोळी, पी.एम.रुपनुर, ए.पी.गायकवाड, डी.बी.गडदे, डी.एच.शिदोरे, एम.एम.साळुंके, ए.एस.
डीग्गीकर, यांच्या सह्या आहेत.
