
इकबाल मुल्ला लोहारा/प्रतिनिधी :- अत्यंत कठीण काळात व विविध प्रसंगी देश रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशा प्रसंगी कशाचीही तमा न बाळगतो तो रात्रीचा दिवस करुन देशसेवा करीत असतो.सेवानिवृत्त झाल्यानंतरही माजी सैनिकांना विविध प्रश्नांसाठी संघर्ष करावा लागतो. तेंव्हा संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्या सैनिकांमध्ये क्षमता असते असे प्रतिपादन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी मेजर एस.फिरासत यांनी केले. उमरगा येथील कस्तुरबाई मंगल कार्यालयाच्या सभागृहात भारतीय माजी सैनिक संघटना आयोजित सस्नेह मेळावा व विशेष सत्कार सोहळ्यात अध्यस्थानावरुन त्या बोलत होत्या.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन अंशदायी योजनेचे माजी कर्नल बालासाहेब लुगडे,नागपूरचे भारतीय माजी सैनिकसंघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गोपाळ वानखेडे,शेंडगे रिसर्च सेंटर तथा इम्पॅनल हॉस्पिटलचे डॉ.आर.डी.शेंडगे,डॉ.प्रतिक जोशी,महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे आदींची तर उपस्थितांमध्ये लातूरचे बाबुराव डांगे, औरंगाबादचे मुरलीधर बिलेवार,नांदेडचे रामराव खडके,हिंगोलीचे सय्यद मीर,यशवंत महाडिक, अँड. अॅड.व्यंकट देशमुख, अदि, उपस्थिती होते. पुढे बोलताना एस.फिरासत म्हणाल्या की,माजी सैनिकांनी सामाजातील लोकसमुहाशी नाते निर्माण करुन एकमेकांशी संवाद साधला पाहिजे.आरोग्याची काळजी घेत-घेत कुटूंबही तंदुरुस्त राहीले पाहिजे.जो पर्यंत आपले कुटूंब आर्थिक दृष्टया स्वालंबी होणार नाही तो पर्यंत विकास अशक्य आहे.आपण सर्वांनी मिळून शासनाच्या योजनेचा अभ्यास करुन इतरांनाही सांगितले पाहिजे.एकजुटीची ताकद अतिशय महत्वाची असून ती अधिक प्रभावी करावी लागेल.या वेळी 'अमर जवान स्तंभास'एस.फिरासतसह सर्व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून दिपप्रज्वलन करुन सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.या वेळी बालासाहेब लुगडे,गोपाळ वानखेडे, डॉ. आर.डी. शेंडगे,डॉ.प्रतिक जोशी,प्रा.डॉ.महेश मोटे या सत्कारमूर्तीचा सन्मानचिन्ह,फेटा,शाल,पुष्पहार व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार तर विशेष सत्कार अशोक काळे व शहाजी चालुक्य यांची नुतन संचालकपदी निवड झाल्याबद्ल सहपत्नी सुवर्णाताईचा सत्कार उमरगा पतसंस्थेच्या वतीने करण्यात आला.वानखेडे,लुगडे, शेंडगे, डांगे, देशमुख, बीलेवार व मोटे यांनी मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले.या वेळी जिल्हाभरातून आलेल्या विरमाता, वीरपत्नी यांना साडीचोळी भेट देण्यात आली. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश रणखांब,लक्ष्मण कलबुर्गे,बबुवान गायकवाड, अदिनाथ घोरपडे, विश्वंभर दासमे,अशोक सुर्यवंशी,काशीनाथ चौधरी, गोविंद काळे,माधव गायकवाड,शिवाजी सैदर्गे,खंडू दूधभाते,सुरेश सुर्यवंशी,जनार्धन सगर,फुलचंद दासिमे, शिवाजी वडदरे,बालवीर शिंदे,दिलीप माने,ज्ञानेश्वर पवार,मेहबुब चाकुरे,परमेश्वर चौगुले,व्यंकट चौधरी, काशीनाथ चिनगुंडे, सुरेश बेंडकाळे,विजयकुमार हिरेमठ,आबाजी जाधव आदींनी पुढाकार घेतला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नूतन संचालक भारतीय माजी सैनिक संघटना,नवी दिल्ली शाहाजी चालुक्य व सुत्रसंचालन प्रा.डॉ.महेश मोटे यांनी केले तर आभार श्रीमंत चव्हाण यांनी मानले. या सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या कार्यक्रमास औरंगाबादसह जिल्हा व परिसरातून बहुसंख्येने माजी सैनिक,वीरमाता,वीरपत्नी व नागरिक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.