रावेर देना बँकेत आधार केंद्र सुरु न केल्यास आमरण उपोषण – संतोष ढिवरे

रावेर प्रतिनिधी :- देना बँकेला यु.आय.डी. दिल्ली व देना बँक मुंबई मुख्य कार्यालयाचे आधार केंद्र सुरु करण्याबाबत सूचना येवूनही बँकेच्या व्यवस्थापकाच्या निष्क्रीयतेमुळे आधार केंद्र सुरु करू देत नसल्याने या बँकेचे ऑपरेटर संतोष ढिवरे या तरुणाने उपोषणाचा इशारा दिला आहे.

सर्व आधार केंद्र हे शासकीय जागेत किंवा बँकेत सुरु करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार संतोष मधुकर ढिवरे, रा. मोरगाव बु. तालुका रावेर, जिल्हा जळगाव या तरुणाने वेळोवेळी आधार केंद्र सुरु करण्यासठी पाठपुरावा केलेला आहे. त्याचे यु.आय.डी. दिल्ली कडून देना बँक रावेर साठी अक्टीव्हेशन झालेले असून सुपरवायजर आय.डी. MH_DENA_SS185793 आहे. तसेच देना बँकेच्या मुंबई येथील मुख्य व्यवस्थापक यांनीहि आधार केंद्र सुरु करण्यासाठी रावेर शाखेला दि. २०/०८/१८ ला मेल दिलेला आहे. तरीही बँकेचे व्यवस्थापक बँकेत आधार केंद्र सुरु करण्यासाठी जागा भरपूर असूनही आधार केंद्र सुरु करू देत नाही. यामुळे श्री. ढिवरे त्रस्त झाले असून त्यांच्या

उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कदाचित ते दलित असल्यामुळे व्यवस्थापक श्री. प्रवीण बोरोले जाणीव पूर्वक त्रास देत असून आधार केंद्र सुरु करू देत नाहीत. असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद आहे.
तरी देना बँकेच्या व्यवस्थापकांनी आधार केंद्र सुरु न करू दिल्यास दि. १७/०९/१८ रोजी पासून रावेर येथील देना बँकेसमोर ते आमरण उपोषण करणार आहे. असेही नेवेदानात म्हटले आहे.

निवेदनाच्या प्रती तहसीलदार रावेर, व्यवस्थापक देना बँक रावेर, पोलीस निरीक्षक रावेर, जिल्हाधिकारी जळगाव, विभागीय व्यवस्थापक देना बँक नाशिक विभाग व मुख्य व्यवस्थापक देना बँक मुंबई यांना देण्यात आल्या आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post