रावेर प्रतिनिधी :- रावेर तालुक्याच्या निंभोरा येथील सौ. डि.आर चौधरी माध्यमिक विद्यालय येथे विद्यालयामार्फत ग्रामस्वच्छता प्रभातफेरी व श्रमदान करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेत,शाळेच्या परीसरात तसेच इंदिरा नगर परिसर आणि स्टेशन परिसर तसेच निभोरा पोलिस स्टेशन या संपूर्ण परिसरा मध्ये जाऊन स्वच्छता केली.
व स्वच्छतेचे महत्व प्रभातफेरी दरम्यान घोषणा देऊन पटवून दिले व श्रमदान केले.यावेळी निंभोरा पोलिस स्टेशनचे सपोनि प्रकाश वानखेडे व फौजदार चंद्रकांत कोसे तसेच त्यांचे सहकारी पोलीस स्टाफ यांनी सुद्धा सहभाग घेतला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सायरा खान मँडम,श्रीमती हेमलता नेमाडे मँडम तसेच शिक्षकभारती संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष श्री.चंद्रकांत देशमुख सर ,रावेर तालुका माध्य.शिक्षक संघाचे श्री.नरेंद्र दोडके सर तसेच गोकुळ भोई सर,सरफराज तडवी सर आणि उदय अवसरमल सर यांनी
तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता व स्वच्छतेविषयीची
प्रभातफेरी यशस्वी केली.
