नई दिल्ली :- पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या(PMJAY) अंतर्गत १० कोटी कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपये आरोग्य विमा दिला जाणार आहे. या योजनेची सुरुवात २३ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी झाराखंड पासून करतील. या योजनेचा लाभ सामाजिक-आर्थिक जनगणनेच्या आधारावर मिळणार आहे. यासाठी ३० एप्रिलला एक मोहीम राबवली गेली.
यावेळी जे लोक सामाजिक-आर्थिक जनगणनेच्या डेटाबेसवर या योजनेचा लाभ घेऊ शकतात, अशा लोकांचा मोबाईल नंबर आणि रेशन कार्डचा नंबर घेतला गेला. त्याबाबत mera.pmjay.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अथवा हेल्पलाइन(१४५५५) वर कॉल करून जाणून घेऊ शकतात.