- दि. १६ ला रात्री ३ ते ४ दरम्यान संपुर्ण शेतात पाणी वाहत असल्यामुळे ६ एकर २० गुठ्ठे पिकांचे नुकसाना सह शेलुबोन्डे येथील शेतीचे खुप मोठ्याप्रमाणात नुकसान..
- संजय भारसाकळे सह इतर शेतक-यावर दुबार पेरणीचे संकट...
आतूल नवघरे
लाखपुरी :-१७, मुर्तिजापुर तालुक्यातील शेंलुबोंन्डे येथील श्री. संजय शंकर भारसाकळे यांच्या ६. एक्कर २० गुन्ठे शेत असुन ते अत्यंत गरिब असुन त्यांची अत्यंत हालाकीची परिस्थीती असुन त्यांनी उदसणवारी करुन कशी तशी पेरणी केली. त्यामध्ये दि. १६ रोजी रात्री ३ ते ४ दरम्यान खुप जो-यात पाऊस आल्यामुळे ६. एक्कर २० गुन्ठे शेतीचे पिक संपुर्ण पाण्यामध्ये आहे . त्यामुळे त्यांच्या शेतीचे नुकसान खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेलु बोंन्डे शिवारातील शेती संपुर्ण पाण्यामध्ये होती. रात्री ४ वाजता पासुन सकाळी ११ पर्य़ंत वाहतुक विस्कळीत झाली होती. या अवकाळी पाऊसामुळे संजय भारसाकळे सह शेलु बोन्डे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दि. १६ पासुन सतत सुरु असलेल्या पावसामुळे संजय शंकर भारसाकळे यांच्या शेतीचे नुकसान झाले.व शेतक-यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे.शेलु बोंन्डे येथील सपुर्ण शेतक-यांचे खुप मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने सदर झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्या करिता महसुल विभागाला व कृषी विभागाला तातडीने सर्वे करण्याचे आदेश देवुन श्री. संजय शंकर भारसाकळे सह शेलुबोन्डे येथील शेतक-यांला तातडीने आर्थिक मदत द्यावी व दुबार पेरणी करिता बियाने उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी संजय भारसाकळे व शेलुबोन्डे येथील शेतक-यांनी केली आहे . जर शासनाने यावर दखल न घेतल्यास तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यांचा ईशारा संजय भारसाकळे सह शेलुबोन्डे येथील शेतक-यानी दिला आहे.
शेलु बोन्डे मध्ये माझे ६ एक्कर २० गुठ्ठे वशेत असुन मी उसणवारी करुन मी पेरणी केली त्यात अवकाळी पावसामुळे माझ्या शेत संपुर्ण पाण्यामध्ये असुन माझ्या संपुर्ण शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे . तरि महसुलविभागाने व कृषी विभागाने तातडीने सर्वे करुन झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी मला द्यावी..
संजय भारसाकळे ( शेतकरी शेलु बोन्डे )
मुर्तिजापुर तालुक्यात ६५ टक्के च्या वर पाऊस झाल असुन मी शेलु बोंन्डे येथे झालेल्या शेतीच्या नुकसाना बाबत मी पंचनामा करण्यास तलाठी व मंडळ अधिकारी यांना सांगितले आहे. श्री . राहुल तायडे ( तहसिलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी मुर्तिजापुर )
