अतुल नवघरे
लाखपुरी :- मुर्तिजापुर तालुक्यातील विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र लाखपूरी येथील श्री लक्षेश्वर संस्थान येथे श्रावण महिन्यानिमित्त प्रथम सोमवारी सकाळी पंडित श्री.रामु महाराज शर्मा यांच्या विधिवत पुजेने अखंड शिवनाम सप्ताहास प्रारंभ झाला. यावेळी यजमान श्री. रमेशजी राठी व सौ माधुरीताई राठी अकोला यांच्यासह कैलास तामसे,नाना मेहर,महादेवराव ठाकरे,पंजाबराव अवघड,दिलीप सुरजूसे,शंकरराव जोगी, प्रमोद अवघड व पोलीस पाटील दिगंबर नाचणे उपस्थित होते. सोमवारच्या पूर्वसंध्येला शेकडो शिवभक्त मूर्तिजापूर व दर्यापूर येथून कावड घेऊन लाखपूरी येथे आले आणि कावड यात्रेला सुरुवात झाली.
अखंड शिवनाम सप्ताह समाप्ती सोमवार दिनांक 20 तारखेला महाप्रसाद द्वारे होणार आहे. श्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवारी दिनांक 2 सप्टेंबरला भव्य यात्रा व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल यावेळी मुर्तिजापुर,दर्यापूर व अंजनगाव या तालुक्यातील शेकडो कावड मंडळासह हजारो शिवभक्त उपस्थित राहतील. यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार नितीन पाटील साहेब व कर्मचारी यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत अशी माहिती लक्षेश्वर संस्थानचे अध्यक्ष श्री राजूभाऊ दहापूते यांनी दिली.

